शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

ऑस्ट्रेलिया आग : आई तुझं लेकरू... शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मादीला बिलगून होतं पिल्लू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 8:55 AM

ऑस्ट्रेलियात लागलेल्या भयंकर आगीच्या झळा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचल्या

मेलबर्न - ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीत निसर्गाची प्रचंड हानी झाली. कोट्यवधी वन्यप्राणीही या आगीत मृत्युमुखी पडले आहेत. आगीने आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे. याशिवाय साधारण 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये लाखो कांगारू अन् हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे. आगीत होरपळलेल्या प्राण्यांचे व्हायरल फोटोने अनेकांचे ह्रदय पिघळले. सोशल मीडियावर असे ह्रदयद्रावक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

ऑस्ट्रेलियात लागलेल्या भयंकर आगीच्या झळा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचल्या. त्यातच, एका गंभीर जखमी कोआला प्राण्याचा फोटो व्हायरल होत असून त्यामध्ये आपल्या आईला बिलगलेल्या कोआलाचं पिल्लू दिसत आहे. जखमी कोआला मादीवर उपचार करण्यात येत होते. मात्र, अग्नितांडवामुळे भयभीत झालेल्या काओला मादीच्या पिल्लाने आईचे ऑपरेशन होईपर्यंत तिला सोडलेच नाही. उपचार करतेवेळी डॉक्टरांनी त्या पिल्लाला बाजूला करण्याचा खूप प्रयत्न केला. पण, त्याने आईला घट्ट सोडलेच नाही. आपल्या आईच्या कुशीत बसलेलं हे पिल्लू पाहून अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. ऑस्ट्रेलियातील वन्यजीव रक्षकांनी या कोआला मादीचे नाव लिजी आणि तिच्या पिल्लाचे नाव फँटम ठेवले आहे. 

आगीच्या दुर्घटनेवेळी स्वत:ची जीव वाचविण्यासाठी जंगलातून धावताना या कोआला मादीला कारची धडक बसली होती. या अपघातानंतर लिजी अन् फँटम यांना प्रसिद्ध वन्यजीव रक्षक स्टीव इरविन यांच्या वाईल्डलाईफ रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी लिजीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यावेळी, आगीपासून आपल्या पिल्लाला वाचविणाऱ्या फँटमने आईला थोडावेळही स्वत:पासून वेगळं होऊ दिलं नाही. जनावरांमधील आई-मुलाचं हे नातं पाहून रुग्णालयातील डॉक्टरही गहिवरले. नकळत, या डॉक्टरांचेही डोळे पाणावले.   दरम्यान, या आगीत भस्मसात झालेल्या प्राणी अन् पक्षांचे छायाचित्र पाहून कोट्यवधींनी देवाचा धावा केला. नागरिकांनी निसर्गाकडे, देवाकडे तेथील स्थिती आटोक्यात यावी म्हणून प्रार्थना केली. या सर्वांची प्रार्थना त्याने ऐकली अन् ऑस्ट्रेलियात वरुण राजाचं आगमन झालं. पावसाच्या आगमनाने तेथील प्राणी, पक्षी अन् जगभरातील मनुष्य सुखावला आहे.  

 

टॅग्स :Australia fireऑस्ट्रेलिया भीषण आगhospitalहॉस्पिटलfireआग