ऑस्ट्रेलियात मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी; १६ वर्षांखालील मुलांसाठी जगात प्रथमच कठोर पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:52 IST2025-12-11T11:51:39+5:302025-12-11T11:52:53+5:30
हा महत्त्वपूर्ण कायदा लागू झाल्यानंतर काही मुलांना त्यांचे अकाउंट बंद झाल्याचे पाहून दुःख झाले, तर काहींनी दाढी-मिशा काढून किंवा मोठ्या भावंडांची मदत घेऊन वयाचे बंधन चुकवण्याचा प्रयत्न केल्याची उदाहरणे समोर आली.

ऑस्ट्रेलियात मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी; १६ वर्षांखालील मुलांसाठी जगात प्रथमच कठोर पाऊल
मेलबर्न / कॅनबेरा : ऑस्ट्रेलियामध्ये १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालणारा ऐतिहासिक कायदा बुधवारपासून लागू झाला आहे. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, हा निर्णय म्हणजे ‘पालकांनी मोठ्या कंपन्यांकडून आपली सत्ता परत घेतल्यासारखे’ आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
भयंकर! पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; कॉन्स्टेबलच्या कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
गोंधळ आणि कठोर अंमलबजावणी
हा महत्त्वपूर्ण कायदा लागू झाल्यानंतर काही मुलांना त्यांचे अकाउंट बंद झाल्याचे पाहून दुःख झाले, तर काहींनी दाढी-मिशा काढून किंवा मोठ्या भावंडांची मदत घेऊन वयाचे बंधन चुकवण्याचा प्रयत्न केल्याची उदाहरणे समोर आली. पंतप्रधान अल्बानीज म्हणाले, ‘हा तो दिवस आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियन कुटुंबे या मोठ्या टेक कंपन्यांकडून सत्ता परत घेत आहेत. मुलांचा निरागस बालपणाचा हक्क व पालकांना अधिक शांतता मिळण्याचा हक्क यांमुळे स्थापित झाला आहे.’ कला क्षेत्रातील मुलांचे या निर्णयामुळे नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
नियम मोडल्यास मोठा दंड
फेसबुक, इन्टाग्राम, किक, रेडिट, स्नॅपचॅट, थ्रेड्स, टिकटॉक, एक्स, यू-ट्यूब आणि ट्विच या बंदी लागू झालेल्या प्लॅटफॉर्मनी १६ वर्षांखालील ऑस्ट्रेलियन मुलांचे खाते काढून टाकण्यासाठी ‘वाजवी पावले’ उचलली नाहीत, तर त्यांना ४९.५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे ३२.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर) पर्यंत दंड होऊ शकतो.
ख्रिसमसपर्यंत अहवाल
ऑस्ट्रेलियाच्या ई-सेफ्टी कमिशनर म्हणाल्या की, या प्लॅटफॉर्म्सकडे वयाचे बंधन अचूकपणे लागू करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि वापरकर्त्यांचा डेटा उपलब्ध आहे. कंपन्यांना नोटीस पाठवून, ख्रिसमसपूर्वी या बंदीच्या अंमलबजावणीचा अहवाल मागवतील.