शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सुलेमानीवरील हल्ला जगाला महागात पडणार; कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 12:15 IST

अमेरिका- इराणदरम्यान तणावाचे वातावरण गेल्या दोन वर्षांपासून आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बगदादच्या अमेरिकन दुतावासावर इराणच्या पुरस्कृत संघटनेने हल्ला चढविला होता.

बगदाद : अमेरिकेने इराणच्या लष्कर प्रमुख पदाचा अधिकारी कासिम सुलेमानीला बगदाद विमानतळावर हवाई हल्ला करून ठार केले. यामुळे इराण संतप्त झाला असून जग युद्धाच्या खाईत लोटले जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. अमेरिकेने केलेला हा हल्ला भ्याड असून दहशतवादी हल्ला असल्याची प्रतिक्रिया इराणकडून आली आहे. तर अमेरिकेतही या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. 

अमेरिका- इराणदरम्यान तणावाचे वातावरण गेल्या दोन वर्षांपासून आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बगदादच्या अमेरिकन दुतावासावर इराणच्या पुरस्कृत संघटनेने हल्ला चढविला होता. याचा बदला म्हणून अमेरिकेने गेल्या चार दशकांपासून हवा असलेल्या सुलेमानीचा खात्मा केला आहे. यामुळे पश्चिम आशियातील वातावरण संतप्त झाले असून इंधनाच्या किंमतीही वाढल्या आहेत. 

सुलेमानीच्या मृत्यूच्या वृत्तानंतर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडच्या किंमतींमध्ये 1.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. एक बॅरलची किंमत 67.12 डॉलरवर पोहोचली आहे. तर अमेरिकन क्रूडच्या किंमतीतही 1.24 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेने या कारवाईचे स्वागत करताना सुलेमानी इराकमधील अमेरिकी अधिकाऱ्यांवर आणि सैनिकांवर हल्ला करण्याचे कट रचत होता. यामुळे त्याला अमेरिकेच्या लष्कराने आत्मसंरक्षणासाठी केलेल्या कारवाईत ठार केल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात इराकच्या एका संघटनेचा म्होरक्या अबू महदी अल मुहादिन याच्यालसह अन्य पाच जण ठार झाले आहेत. 

या हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना इराणने निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्री जावद झरीफ यांनी सांगितले की, अमेरिका जागतिक दहशतवादी असल्यासारखे वागत आहे. अमेरिकेला याची जबाबदारी घ्यावीच लागेल. सुलेमानीवरील हल्ला हा अमेरिकेने केलेली घोडचूक आणि धोक्याचे आहे. 

इराकची राजधानी बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने हवाई हल्ला करून इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला ठार केले आहे. मेजर जनरल कासिम सुलेमानी असे या अधिकाऱ्य़ाचे नाव असून इराणच्या कद्स फोर्सचे ते प्रमुख होते. सुलेमानी यांच्या वाहनांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला केला. यामध्ये इराणच्या पॉप्‍युलर मोबीलायझेशन फोर्सचे डेप्‍युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांचाही मृत्यू झाल्याचे समजते. 

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाqasem soleimaniकासीम सुलेमानी