नेपाळमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, 16 मृत्यू आणि 24 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 18:07 IST2022-10-06T18:06:00+5:302022-10-06T18:07:07+5:30
अपघातातील जखमींना हेटौडा, चुरे हिल आणि सांचो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

नेपाळमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, 16 मृत्यू आणि 24 जखमी
काठमांडू: नेपाळमधूनअपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी बारा येथे बस अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला. एकट्या हेटौडा रुग्णालयात 12 जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना हेटौडा, चुरे हिल आणि सांचो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
Nepal | At least 16 dead, 24 injured in a road accident in Bara District, say police.
— ANI (@ANI) October 6, 2022
पोलिसांनी सांगितले की, बस नारायणघाटहून बीरगंजकडे जात होती. अमलेखगंज उपमहानगरातील जीतपूर सिमरा येथील पुल क्रमांक 3 वरून बस नदीत कोसळली. बारा जिल्हा पोलीस कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 11 वाजता घडली असून यामध्ये 24 जण जखमी झाले आहेत. अपघातात सात पुरुष आणि सहा महिलांचा मृत्यू झाला असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
सोमवारीही बस अपघातात दोघांचा मृत्यू झाला
याआधी सोमवारी बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता, तर 36 जण जखमी झाले होते. ही घटना पूर्व-पश्चिम महामार्गावरील हेटौडा उपमहानगरी-15 मधील चुरियामाई मंदिराजवळ घडली होती. रात्री बस काठमांडूहून झापाकडे जात होती. या घटनेत इतर सहा जण गंभीर जखमी झाले, त्यांना प्राथमिक वैद्यकीय उपचारानंतर भरतपूर आणि काठमांडू येथील रुग्णालयात हलवण्यात आले.