एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 13:08 IST2025-09-07T13:05:10+5:302025-09-07T13:08:45+5:30

एस्ट्रॉनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख क्रिस्टिन कॅबोट पतीला घटस्फोट देणार आहेत. त्यांनी यासाठी अर्ज दाखल केला आहे.

Astronomer Company's Ex-HR Head Cabot Files for Divorce; Video of Dance with CEO Goes Viral | एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता

एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता

एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख क्रिस्टिन कॅबोट यांचा काही दिवसापूर्वी कंपनीच्या सीईओसोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. आता त्या  पतीला घटस्फोट देणार आहेत. यासाठी त्यांनी घटस्फोटाची याचिकाही दाखल केली आहे. 

क्रिस्टिन आणि बायरन जुलैमध्ये मॅसॅच्युसेट्समधील गिलेट स्टेडियममध्ये कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये कैद झाले होते. या दरम्यान, त्यांनी कॅमेरा टाळण्याचा प्रयत्न केला. अँडी बायरन हे कंपनीचे सीईओ आणि बॉस आहेत.

रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू

कंपनीच्या दोन्ही अधिकाऱ्यांचा व्हिडीओ समोर आला होता. क्रिस्टिन आणि बायरन कॅमेऱ्यात रोमँटिक असताना कैद झाले, त्यादरम्यान गायक क्रिस मार्टिनने विनोदाने म्हटले की एकतर त्या दोघांचेही प्रेमसंबंध आहेत किंवा दोघेही खूप लाजत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक प्रकारचे वादविवाद सुरू झाले.

दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी दोघांबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. क्रिस्टिन कॅबोटचे लग्न प्रॅव्हेटियर रमचे सीईओ अँड्र्यू कॅबोटशी झाले होते. यासोबतच अँडी बायर्नचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह केरिगनशी लग्न झाले आहे.

क्रिस्टिनने १३ ऑगस्ट रोजी न्यू हॅम्पशायरच्या पोर्ट्समाउथ कोर्टात घटस्फोटासाठी कागदपत्रे दाखल केल्याचे वृत्त आहे. अँड्र्यू कॅबोटचा हा तिसरा घटस्फोट आहे.

कंपनीने दोन्ही कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवले

व्हिडीओ व्हायरल होताच कंपनीने अंतर्गत चौकशी सुरू केली. त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांना काही दिवसांसाठी रजेवर पाठवण्यात आले. काही दिवसांनी सीईओने राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य उत्पादन अधिकारी पीट डीजॉय यांना अंतरिम सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले. नंतर, कॅबोट यांनी देखील एचआर प्रमुखपदाचा राजीनामा दिला.

Web Title: Astronomer Company's Ex-HR Head Cabot Files for Divorce; Video of Dance with CEO Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.