चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 05:39 IST2026-04-12T05:38:14+5:302026-04-12T05:39:16+5:30

Artemis II: तब्बल ५४ वर्षांनंतर ‘चंद्रा’च्या भेटीसाठी ‘आर्टेमिस-२’ यानाने दहा दिवसांपूर्वी रवाना झालेले चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतले. भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी पहाटे ५.३७ वाजता अमेरिकेत पॅसिफिक महासागरात सॅन दिएगो किनारपट्टीलगत ओरियन कॅप्सूलचे स्प्लॅशडाऊन झाले. 

Astronauts return safely after landing on the moon | चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले

चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले

वॉशिंग्टन -  तब्बल ५४ वर्षांनंतर ‘चंद्रा’च्या भेटीसाठी ‘आर्टेमिस-२’ यानाने दहा दिवसांपूर्वी रवाना झालेले चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतले. भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी पहाटे ५.३७ वाजता अमेरिकेत पॅसिफिक महासागरात सॅन दिएगो किनारपट्टीलगत ओरियन कॅप्सूलचे स्प्लॅशडाऊन झाले. 

२० जुलै १९६९ रोजी अपोलो-११ मोहिमेत नील आर्मस्ट्राँग यांच्या रूपाने मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर १९७२ मध्ये अपोलो-१७ पर्यंत विविध चांद्रमोहिमा सुरू होत्या. आता ५४ वर्षांनंतर आर्टेमिस-२ मोहिमेत चार अंतराळवीरांच्या रूपाने मानव पुन्हा चंद्रापर्यंत जाऊन आला. या मोहिमेच्या यशाबद्दल अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहभागी सर्वांचे अभिनंदन केले आहे. 

सर्व अंतराळवीर तंदुरुस्त
दहा दिवसांत ३९ हजार ६९२ कि. मी. ताशी कमाल वेगाने अवकाशात एकूण ११ लाख २६ हजार कि. मी. एवढे प्रचंड अंतर पार करून कमांडर रीड वाईझमन, पायलट व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टिना कोच आणि कॅनडाचे जेरेमी हॅनसेन यांना घेऊन कॅप्सूल शनिवारी पहाटे पॅसिफिक महासागरात सुरक्षित उतरली. हे चारही अंतराळवीर तंदुरुस्त आहेत.

लँडिंग न करता यू-टर्न : आर्टेमिस-२ यानाने चंद्रावर लँडिंग न करता पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्राच्या अंधारमय अशा मागील भागापर्यंत मजल मारली आणि काही अंतर पार करून यू-टर्न घेत परतीचा प्रवास सुरू केला. 
होय... मार्ग उघडला : क्षत्रिय :नासा’त कार्यरत भारतीय वंशाचे सहायक प्रशासक अमित क्षत्रिय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की चंद्रापर्यंत पोहचण्याचा मार्ग आता उघडला आहे. परंतु, पुढील काम यापेक्षा अधिक जोखीमीचे आहे. 

... ती सहा मिनिटे
चार अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीकडे झेपावलेले कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना तप्त लाल प्लाझ्माने घेरले गेले व ६ मिनिटे कंट्रोल रूमशी अंतराळवीरांचा संपर्क तुटला तेव्हा नियंत्रण कक्षात सर्वांच्या हृदयाचे ठोके काही क्षण चुकले. मात्र, कॅप्सूलभोवती असलेले जीवनरक्षक कवच कामी आले आणि पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला. 
...अन् कॅप्सूल लँड झाली
हजारो कि. मी. ताशी वेगाने उतरणारे कॅप्सूल समुद्रात किनारपट्टीपासून सुमारे ३२०० कि. मी. आत सुरक्षित उतरले तेव्हा  अमेरिकी नागरिक तसेच नासाच्या नियंत्रण कक्षातील सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवून आनंद साजरा केला.

 

Web Title : चंद्र मिशन के बाद अंतरिक्ष यात्री सुरक्षित लौटे: 54 साल बाद मिली सफलता

Web Summary : 54 वर्षों बाद, आर्टेमिस-2 मिशन पर अंतरिक्ष यात्री प्रशांत महासागर में सुरक्षित रूप से उतरे। मिशन बिना उतरे चंद्रमा की परिक्रमा करता रहा, भविष्य के चंद्र प्रयासों का मार्ग प्रशस्त करता है। वायुमंडलीय प्रवेश के दौरान संचार ब्लैकआउट के बावजूद, चालक दल सुरक्षित उतरा।

Web Title : Astronauts Return Safely After Moon Mission: A 54-Year Feat

Web Summary : After 54 years, astronauts on the Artemis-2 mission safely returned to Earth, splashing down in the Pacific. The mission orbited the moon without landing, paving the way for future lunar endeavors. Despite a tense communication blackout during atmospheric entry, the crew landed safely and are in good health.