असीम मुनीर आयुष्यभर वर्दीवरच राहतील, कधीच अटक होणार नाही; पाकिस्तान सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 09:21 IST2025-12-05T09:09:02+5:302025-12-05T09:21:37+5:30
असीम मुनीर यांना काही महिन्यांपूर्वी फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली, पाकिस्तानच्या इतिहासातील ही अशी दुसरी पदोन्नती होती. मागील पद जनरल अयुब खान यांच्याकडे होते.

असीम मुनीर आयुष्यभर वर्दीवरच राहतील, कधीच अटक होणार नाही; पाकिस्तान सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांची संरक्षण दल प्रमुख या नवीन पदावर औपचारिक नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांमध्ये चांगले समन्वय साधण्याच्या उद्देशाने गेल्या महिन्यात हे पद निर्माण करण्यात आले होते. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मुनीर यांची लष्करप्रमुख तसेच संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याची विनंती राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना पाठवण्यात आली होती, ती राष्ट्रपतींनी मंजूर केली आहे.
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
निवेदनानुसार, ही नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी असेल. यासोबतच, पंतप्रधानांनी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल झहीर अहमद बाबर यांना दोन वर्षांची मुदतवाढही दिली आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर, असीम मुनीरने पाकिस्तानमध्ये खोटा प्रचार पसरवला होता. यात त्यांनी पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांना फील्ड मार्शल म्हणून पदोन्नती दिली. तेव्हापासून, असीम मुनीर त्यांच्याकडे अमर्याद अधिकार आहेत.
मुनीर कोणाची जागा घेतील?
सीडीएफने जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष यांची जागा घेतली आणि हे पद रद्द केले. राष्ट्रपती कार्यालयाने मुनीर यांना त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले. राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे मुनीर यांना या पदावर नियुक्त करण्याची योजना रखडण्याची शक्यता असल्याच्या अफवांनाही पूर्णविराम मिळाला. तत्पूर्वी, कायदा मंत्री आझम नझीर तरार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, संरक्षण दल प्रमुखांच्या नियुक्तीच्या अधिसूचनेत कोणतेही कायदेशीर किंवा राजकीय अडथळे नाहीत आणि लवकरच अधिसूचना जारी केली जाईल. त्यांच्या नियुक्तीविरुद्ध देशभरात निदर्शने झाली होती. मुनीर यांची २०२२ मध्ये लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०२४ मध्ये त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांसाठी वाढविण्यात आला. २७ नोव्हेंबरपासून त्यांची नियुक्ती प्रलंबित होती.