Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारेपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, पाकिस्तानी राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्व नेते पाकिस्तानच्या विजयाचा खोटा दावा करत आहेत. आज पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. या पार्श्वभूमीवर पीएम शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानशी झालेल्या संघर्षासाठी भारत जबाबदार असल्याचे म्हटले. त्यानंतर, आता राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी काश्मीरचा उल्लेख करत भारताविरोधात गरळ ओकली.
पाकिस्तान विजयी झाल्याचा दावामीडिया रिपोर्ट्सनुसार, झरदारी म्हणाले, "भारताने हल्ला करून चूक केली, परंतु पाकिस्तानने धैर्याने आणि संयमाने उत्तर दिले. जगाला हे देखील कळले की, पाकिस्तानला शांतता हवी आहे. मात्र, देशाच्या अखंडतेचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षमही आहे. आम्ही कोणाच्याही दबावापुढे झुकत नाही आणि कधीही झुकणार नाही." ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला मात्र, झरदारी म्हणतात, "पाकिस्तानने भारताविरुद्धच्या संघर्षात विजय मिळवला. या विजयाने आम्हाला आठवण करुन दिली की, सर्वजण एकजूट आहोत."
काश्मीरबद्दल काय म्हटले?काश्मीरबद्दल बोलतना आसिफ अली झरदारी म्हणाले, "पाकिस्तान नेहमीच काश्मीरचे समर्थन करेल. आम्ही सर्वजण काश्मीरसोबत आहोत. काश्मीरींचे धाडस आणि न्यायासाठीचा संघर्ष आमच्या हृदयाच्या जवळ आहे. त्यांना आत्मनिर्णयाचा अधिकार मिळेपर्यंत पाकिस्तान आपला अटळ राजनैतिक, नैतिक आणि राजकीय पाठिंबा देत राहील," अशी मुक्ताफळे झरदारी यांनी उधळली.