article 370 pakistan pm imran khan pm modi kashmir terrorism pulwama | इम्रान खान यांची पुन्हा दर्पोक्ती; भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी
इम्रान खान यांची पुन्हा दर्पोक्ती; भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी

इस्लामाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. तसेच काश्मीर मुद्दा हा आमचा अंतर्गत विषय असल्याचं मोदींनी पुन्हा एकदा ट्रम्पना सांगितलं. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. ते म्हणाले, काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आता पुढच्या महिन्यात हा मुद्दा जागतिक स्तरावर UNGAमध्ये उपस्थित करणार आहोत.

काश्मीरसाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास आम्ही तयार आहोत. दोन्ही देशांकडे आण्विक शक्ती, त्याचा वापर केल्यास जगात हाहाकार माजेल, इम्रान खान यांनी अप्रत्यक्षरीत्या भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. आता बालाकोटसारखे हल्ले भारत पुन्हा करू शकणार नाही. जोपर्यंत काश्मीर स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत काश्मीरचा मुद्दा आम्ही लावून धरू, असंही इम्रान खान यांनी सांगितलं आहे.

माझं सरकार आल्यानंतर मी पहिल्यांदा रोजगार वाढवण्यास प्राधान्य दिलं. हवामान बदल भारत आणि पाकिस्तान दोघांनाही प्रभावित करतो. त्यामुळेच आम्हाला शेजारील राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहेत. भारत एक पाऊल पुढे आल्यास आम्ही दोन पावलं पुढे येऊ. मला भारताबरोबर काश्मीर मुद्द्यावर चर्चा करायची आहे. परंतु जेव्हाही आम्ही काश्मीरच्या मुद्द्यावर बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी ते दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करतात. आम्ही जगातील सर्वच मुख्य देशांशी या मुद्द्यावरून चर्चा केली आहे. संयुक्त राष्ट्रातही 1965नंतर पहिल्यांदाच काश्मीर मुद्द्यावर चर्चा झाली आहे. मी दोन्ही देशांमध्ये शांती नांदावी यासाठी प्रयत्नशील आहे. आम्ही FATF सारख्या संस्थांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचा घेतलेला निर्णय हा नेहरूंनी काश्मिरींना दिलेल्या आश्वासनापासून पळण्याचा प्रकार आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर मोदींनी मोठी चूक केली आहे. आता काश्मिरींना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ऐतिहासिक संधी आहे.  

Web Title: article 370 pakistan pm imran khan pm modi kashmir terrorism pulwama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.