Army: १२६,०२८,७८०,०००,००० रुपये कुठे जातात? लष्करावर सर्वाधिक खर्च करणारे पहिले दहा देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 06:35 IST2022-08-30T06:34:59+5:302022-08-30T06:35:20+5:30
Defence: शीर्षकात दिलेली संख्या वाचण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या तोंडाला फेस येऊ शकेल. १५७६ बिलियन डॉलर्स ही रक्कम आजच्या दराने रुपयांंत रुपांतरित केली तर हाती लागणारा हा अवाढव्य आकडा...

Army: १२६,०२८,७८०,०००,००० रुपये कुठे जातात? लष्करावर सर्वाधिक खर्च करणारे पहिले दहा देश
शीर्षकात दिलेली संख्या वाचण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या तोंडाला फेस येऊ शकेल. १५७६ बिलियन डॉलर्स ही रक्कम आजच्या दराने रुपयांंत रुपांतरित केली तर हाती लागणारा हा अवाढव्य आकडा... हा आकडा आहे देशातल्या पहिल्या दहा देशांच्या लष्करावर होणाऱ्या खर्चाचा! सेनादलांवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या पहिल्या दहा देशांच्या यादीत अमेरिका अर्थातच अग्रक्रमावर आहे. त्याखालोखाल चीन आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर भारत. भारताचा सेनादलांवरील वार्षिक खर्च आहे ७६.७ बिलियन डॉलर्स इतका!