Asim Munir Asif Ali Zardari: पाकिस्तानात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होणार असल्याच्या चर्चेचे पेव फुटले. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिफ मुनीर हे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना हटवण्याच्या तयारी आहेत, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानात आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातही याबद्दल कुजबूज सुरू झाली असून, पाकिस्तान सरकारने याबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेच्या चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिफ मुनीर आसिफ झरदारी यांना राष्ट्रपती पदावरून हटवण्याच्या तयारीत आहेत. मुनीर यांना स्वतःला राष्ट्रपती व्हायचे आहे, अशी चर्चा आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री काय बोलले?
लष्करप्रमुख मुनीर यांचा राष्ट्रपती पदावर डोळा असल्याच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
नकवी म्हणाले, "वाईट हेतूने हा प्रचार सुरू आहे. याची आम्हाला जाणीव आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीफ यांना लक्ष्य करण्यासाठी अशा पद्धतीने मोहीम चालवली जात आहे. ते कोण आहे?"
वाचा >>इराण अमेरिकेसोबत अणु चर्चा करण्यास तयार, पण...; काय आहे त्यांची 'ही' मागणी?
"मी याधीही सांगितले आहे की, राष्ट्रपती झरदारी यांच्या राजीनाम्याबद्दल कुठलीही चर्चा झालेली नाही. अशी चर्चा होण्याची कोणतीही शक्यता नाही. लष्करासोबत राष्ट्रपती झरदारी यांचे चांगले आणि सन्मानजनक संबंध आहेत", असेही नकवी म्हणाले.
गृहमंत्री नकवी म्हणाले, "मला माहिती आहे की, या खोट्या बातम्या कोण पसरवत आहेत आणि का पसरवल्या जात आहेत? यामुळे कोणाला फायदा होणार आहे? आसिफ मुनीर यांचे पूर्णपणे लक्ष पाकिस्तानला मजबूत करण्यावर आणि देशात स्थिरता आणण्यावर आहे. जे अशा पद्धतीने फेक नरेटिव्ह पेरत आहेत, ते शत्रूंसोबत मिळून अशा पद्धतीने मोहीम चालवत आहेत. पण, आम्ही पाकिस्तानला मजबूत आणि जे जे करावे लागेल ते करू", असे म्हणत नकवींनी राजकीय अस्थिरतेच्या चर्चा फेटाळून लावल्या.