ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये शिरला सशस्त्र हल्लेखोर; सीक्रेट सर्व्हिसच्या गोळीबारात ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 21:29 IST2026-02-22T21:28:53+5:302026-02-22T21:29:21+5:30

मार-ए-लागो हे ट्रम्प यांचे आवडते रिसॉर्ट असून ते अनेकदा आपला विकेंड येथे घालवतात. मात्र, या घटने वेळी ते आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प हे दोघेही व्हाईट हाऊसमध्ये होते.

Armed attacker enters Trump's Mar-a-Lago resort; Secret Service shoots dead | ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये शिरला सशस्त्र हल्लेखोर; सीक्रेट सर्व्हिसच्या गोळीबारात ठार

ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये शिरला सशस्त्र हल्लेखोर; सीक्रेट सर्व्हिसच्या गोळीबारात ठार

अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील पाम बीच येथील 'मार-ए-लागो' रिसॉर्टमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका सशस्त्र व्यक्तीला सुरक्षा दलांनी अथवा सीक्रेट सर्विसने ठार केले आहे. ही घटना रविवारी घडली. यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. मार-ए-लागो हे ट्रम्प यांचे आवडते रिसॉर्ट असून ते अनेकदा आपला विकेंड येथे घालवतात. मात्र, या घटने वेळी ते आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प हे दोघेही व्हाईट हाऊसमध्ये होते.

शॉटगन आणि इंधनाची कॅन घेऊन जाताना दिसला होता हल्लेखोर -
सीक्रेट सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, एक सशस्त्र व्यक्ती रिसॉर्टच्या उत्तर गेटजवळ शॉटगन आणि इंधनाची कॅन घेऊन जाताना दिसली होती. तिने मार-ए-लागोच्या सुरक्षा परिघात शिरली होती. सीक्रेट सर्विस एजंट आणि पाम बीच काउंटीच्या शेरीफ डेप्युटीने संबंधित व्यक्तीवर गोळीबार केला. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अद्याप हल्लेखोराची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

ट्रम्प यांच्यावर या पूर्वीही झाले आहेत हल्ले -
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर यापूर्वीही जीवघेणे हल्ले झाले आहेत. १३ जुलै २०२४ रोजी पेनसिल्व्हेनियातील रॅलीदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला होता, ज्यात ते थोडक्यात वाचले होते. त्यानंतर १५ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या गोल्फ कोर्सजवळ रायफलसह एका व्यक्तीला पकडण्यात आले होते, ज्याला नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Web Title : ट्रम्प के मार-ए-लागो रिसॉर्ट में सशस्त्र हमलावर ढेर; सीक्रेट सर्विस ने मारी गोली

Web Summary : डोनाल्ड ट्रम्प के मार-ए-लागो रिसॉर्ट में एक बंदूकधारी को सीक्रेट सर्विस ने मार गिराया। वह शॉटगन और ईंधन कैन लेकर आया था। ट्रम्प उस समय वहां नहीं थे। इससे पहले भी ट्रम्प पर हमले हो चुके हैं, जिनमें पेनसिल्वेनिया में गोलीबारी और गोल्फ कोर्स पर गिरफ्तारी शामिल है।

Web Title : Gunman Killed at Trump's Mar-a-Lago Resort; Secret Service Shoots

Web Summary : A gunman carrying a shotgun and fuel can was shot dead by Secret Service at Donald Trump's Mar-a-Lago resort in Florida. Trump was not present. This follows previous threats against Trump, including a shooting in Pennsylvania and an arrest at a golf course.