ॲपलच्या बॉसला १४४७ पट पगार; सामान्य कर्मचाऱ्यांचे वेतन अतिशय कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 08:54 IST2022-01-12T08:53:44+5:302022-01-12T08:54:13+5:30
जगभरातील अन्य महत्त्वाच्या ५०० कंपन्यांमध्ये वरिष्ठ बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातला हा फरक मात्र सरासरी २९९ पट आहे.

ॲपलच्या बॉसला १४४७ पट पगार; सामान्य कर्मचाऱ्यांचे वेतन अतिशय कमी
ॲपल या बलाढ्य कंपनीचे बॉस टीम कुक यांना २०२१ मध्ये पगारापोटी तब्बल ९८.७ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढे घसघशीत पॅकेज मिळाले. त्या तुलनेत सामान्य कर्मचाऱ्यांचे वेतन अतिशय कमी आहे. ॲपलमधला मेडियन (मध्यक) पगार आहे वार्षिक ६८,३०० अमेरिकन डॉलर!
मध्यक म्हणजे सर्वांत वरिष्ठ ते सर्वांत कनिष्ठ अशा कर्मचाऱ्यांच्या बरोबर मध्यस्थानी असणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार या तुलनेत टीम कुक यांची वार्षिक कमाई तब्बल १४४७ पट जास्त आहे. जगभरातील अन्य महत्त्वाच्या ५०० कंपन्यांमध्ये वरिष्ठ बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातला हा फरक मात्र सरासरी २९९ पट आहे.
संदर्भ : ॲपल आणि एक्झिक्युटिव्ह पे वोच आणि स्टॅटिस्टा.