'या' स्टार खेळाडूने मॉडलला रात्री उशीरा हॉटेलवर बोलवलं, लीक झाली सेक्स आणि स्कॅंडल चॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 11:53 IST2022-01-08T11:49:26+5:302022-01-08T11:53:33+5:30

एंटोनियो अमेरिकन फुटबॉल खेळाडू आहे. एवा लुइसने डेली मेलसोबत बोलताना एंटानियो ब्राउनचं चॅट सार्वजनिक केलं. 

Antonio Brown invite only fans star model Ava Louise in hotel nfl American football | 'या' स्टार खेळाडूने मॉडलला रात्री उशीरा हॉटेलवर बोलवलं, लीक झाली सेक्स आणि स्कॅंडल चॅट

'या' स्टार खेळाडूने मॉडलला रात्री उशीरा हॉटेलवर बोलवलं, लीक झाली सेक्स आणि स्कॅंडल चॅट

स्टार खेळाडू एंटोनियो ब्राउन (Antonio Brown) ने मॉडल एवा लुइस (Ava Louie) ला रात्री आपल्या हॉटेलमध्ये बोलवलं. यादरम्यान त्यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं. त्यांनी सिक्युरिटीला चकमा दिला आणि एंटानियोच्या बोलवण्यावरून ती हॉटेलमध्ये पोहोचली. एंटोनियो अमेरिकन फुटबॉल खेळाडू आहे. एवा लुइसने डेली मेलसोबत बोलताना एंटानियो ब्राउनचं चॅट सार्वजनिक केलं. 

सोशल मीडिया स्टार एवाने सांगितलं की, ती एंटोनियोच्या संपर्कात सर्वातआधी २०१८ मध्ये आली होती. त्यांचं चॅटींग इन्स्टाग्रामवरून सुरू झालं होंतं.  नव्या वर्षाआधी एंटानियोने तिला हॉटेलमध्ये बोलवलं होतं.

आधी तर तिने जाण्यास नकार दिला. पण नंतर ती रात्री साधारण ११ वाजता हॉटेलमध्ये पोहोचली. इथे लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे नॅशनल फुटबॉल लीग असल्याने खेळाडूंसाठी कोविड बायो बबल तयार करण्यात आला होता. जेणेकरून खेळाडू दुसऱ्या कुणाच्या संपर्कात येऊ नये. या नियमानुसार खेळाडू कोणत्याही ओळखीच्या व्यक्तीला हॉटेलवर बोलवू शकत नव्हते. 

तरीही एवा लुइस हॉटेलमध्ये गेली. Only Fans साइटवर स्टार इन्फ्लूएन्सर Ava ने डेली मेलला सांगितलं की, यादरम्यान दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. तेच एंटोनियोला हे खाजगी क्षण फोनमध्ये रेकॉर्ड करायचे होते. एंटोनियोची नव्या वर्षाच्या ठीक एक दिवसाआधीचं चॅट समोर आलं आहे. यादरम्यान त्यांच्या खाजगी क्षणांचे फोटोही डेली मेलच्या रिपोर्टमध्ये समोर आले आहेत.
 

Web Title: Antonio Brown invite only fans star model Ava Louise in hotel nfl American football