कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 20:16 IST2025-08-07T19:58:44+5:302025-08-07T20:16:15+5:30

कॅनडातील सरे शहरात असलेल्या प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याच्या कॅफेमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. कॅफेवर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे.

Another shooting at Kapil Sharma's Canada Cafe, 'this' goon takes responsibility by posting a video | कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली

कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली

कॅनडातील सरे शहरातील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. कपिल शर्मा याच्या कॅफेवर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये कारमध्ये बसलेले काही लोक कॅफेच्या दिशेने गोळीबार करताना दिसत आहेत. दरम्यान, गोल्डी ढिल्लन नावाच्या गुंडाने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. 

या टोळीने सोशल मिडियावर पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. मात्र, या गोळीबारात अजून कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  

या घटनेवर कपिल शर्माकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी, गेल्या महिन्यात १० जुलै रोजी कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये गोळीबार झाला होता. याचा व्हिडिओही समोर आला होता. हल्लेखोराने कारमधून पिस्तूल काढून १० ते १२ राउंड गोळीबार केला. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंह लड्डीने गोळीबाराची जबाबदारी घेतली. हरजीत सिंह लड्डी हा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीतील आहे, तो बीकेआयशी संबंधित आहे. लड्डीने म्हटले आहे की, कपिल शर्माच्या काही जुन्या विधानामुळे हा हल्ला केला.

गोल्डी ढिल्लन लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करतो. 'सर्व भावांना राम राम गोल्डी ढिल्लन आणि लॉरेन्स बिश्नोई टोळी आज सरे येथील कपिल शर्माच्या कप्स कॅफेमध्ये झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेत आहे.' असं गोल्डीने एका ऑनलाइन पोस्टमध्ये लिहिले आहे. 

यापूर्वी, गेल्या महिन्यात १० जुलै रोजी कपिल शर्माच्या कप्स कॅफेमध्ये गोळीबार झाला होता. त्याचा व्हिडिओही समोर आला होता. हल्लेखोराने कारमधून पिस्तूल काढून १० ते १२ राउंड गोळीबार केला होता. 

Web Title: Another shooting at Kapil Sharma's Canada Cafe, 'this' goon takes responsibility by posting a video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.