एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सचे आणखी एक मिशन अयशस्वी; चाचणीनंतर काही मिनिटांतच रॉकेटशी संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 08:15 IST2025-03-07T08:14:16+5:302025-03-07T08:15:53+5:30
एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीने गुरुवारी एका रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. पण, काही मिनिटांतच या रॉकेटचा संपर्क तुटला.

एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सचे आणखी एक मिशन अयशस्वी; चाचणीनंतर काही मिनिटांतच रॉकेटशी संपर्क तुटला
स्पेसएक्स ही एलॉन मस्क यांची कंपनी आहे. या कंपनीने काल गुरुवारी एका रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. पण, हे प्रक्षेपण अयशस्वी झाले आहे. स्पेसएक्सच्या प्रक्षेपणानंतर काही मिनिटांतच अंतराळात असलेल्या स्टारशिप रॉकेटशी संपर्क तुटला. एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीला सलग दुसऱ्यांदा अपयशाला सामोरे जावे लागले आहे.
‘पीओके’ भारतात आल्यानंतर सुटेल काश्मीरचा प्रश्न; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे वक्तव्य
स्टारशिपच्या प्रक्षेपणाला सलग दुसऱ्यांदा अपयश आले आहे. आता कंपनीच्या कामगिरीबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.
कंपनीच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये सर्व काही दाखवण्यात आले. गुरुवारी प्रक्षेपणानंतर काही मिनिटांतच स्पेसएक्सने अवकाशात त्यांच्या स्टारशिपवरील नियंत्रण गमावले. यामुळे इंजिन बंद पडले, असे कंपनीच्या लाईव्हस्ट्रीममध्ये दिसून आले.
यानंतर काही मिनिटांतच सोशल मीडियावर दक्षिण फ्लोरिडा आणि बहामासजवळ संध्याकाळी आकाशात अंतराळयानातून आगीच्या गोळ्यासारखा ढिगारा दाखवणारे अनेक व्हिडीओ समोर आले.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, स्पेसएक्सच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये स्टारशिप अनियंत्रितपणे हवेत जात असल्याचे दिसत आहे. अंतराळ प्रक्षेपणाच्या ढिगाऱ्यांमुळे फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने मियामी, फोर्ट लॉडरडेल, पाम बीच आणि ऑर्लँडो विमानतळांवरील उड्डाणे तात्पुरती थांबवली आहेत. स्पेसएक्सच्या लाइव्ह स्ट्रीममध्ये स्टारशिप अनियंत्रितपणे कोसळत असल्याचे दाखवल्यानंतर ते अवकाशातच विखुरले.
Just saw Starship 8 blow up in the Bahamas @SpaceX@elonmuskpic.twitter.com/rTMJu23oVx
— Jonathon Norcross (@NorcrossUSA) March 6, 2025