24 तासांत 1.25 कोटींच्या भेटवस्तू अन् 5 नोकऱ्यांच्या ऑफर; पाकिस्तानात अंजूचे थाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 20:23 IST2023-07-30T20:22:42+5:302023-07-30T20:23:26+5:30
Anju becomes Fatima: भारतातून पाकिस्तान गेलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारुन नसरुल्लासोबत लग्न केल्याची माहिती आहे.

24 तासांत 1.25 कोटींच्या भेटवस्तू अन् 5 नोकऱ्यांच्या ऑफर; पाकिस्तानात अंजूचे थाट
Anju Nasrullah News: मागील काही दिवसांपासून पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा सुरू होती. पण, आता भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजूदेखील चर्चेत आली आहे. अंजू इस्लाम धर्म स्वीकारुन फातीमा झाली असून, 25 जुलै रोजी मित्र नसरुल्लासोबत लग्नही केल्याची माहिती आहे. पण, अंजूने या वृत्तांचे खंडन केले आहे. आता माहिती मिळतीये की, अंजूला 24 तासांत सुमारे 1.25 कोटींचे गिफ्ट मिळाले आहेत.
शनिवारी सोशल मीडियावर अंजू आणि नसरुल्लाचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये हे जोडपे एका रिअल इस्टेट कंपनीच्या सीईओसोबत दिसत आहेत. व्हिडिओनुसार नसरुल्ला आणि अंजू यांना कंपनीच्या सीईओनी निवासी भूखंड, 50,000 पाकिस्तानी रुपये आणि इतर मौल्यवान वस्तू भेट दिल्या आहेत. भारतीय पत्रकार रविंदर सिंग रॉबिन यांनी हा व्हिडिओ सर्वप्रथम ट्विटरवर पोस्ट केला आहे.
याशिवाय, पाकिस्तानच्या 5 कंपन्यांनी अंजूला नोकरीच्या ऑफर दिल्या आहेत. अंजू आणि नसरुल्ला 31 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊ शकतात. यात अंजू पाकिस्तानच्या नागरिकत्वाची मागणी करू शकते. यासोबतच ती पाकिस्तान सरकारकडे तिची मुले भारतातून आणण्याची मागणी करू शकते. अंजूच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षा कर्मचारी देण्यात आले आहेत.