ट्रम्प यांचा आदेश अन् भारतीय जोडप्याला अमेरिकेच्या एअरपोर्टवरूनच माघारी पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:30 IST2025-01-27T12:29:31+5:302025-01-27T12:30:05+5:30

अमेरिकेत इमिग्रेशन नियमात झालेले बदल पाहता भारत सरकारने प्रवाशांसाठी अतिरिक्त सतर्कता बाळगण्याचा आग्रह केला आहे.

An Indian couple visiting their children in the US were reportedly denied entry at America Newark Airport | ट्रम्प यांचा आदेश अन् भारतीय जोडप्याला अमेरिकेच्या एअरपोर्टवरूनच माघारी पाठवले

ट्रम्प यांचा आदेश अन् भारतीय जोडप्याला अमेरिकेच्या एअरपोर्टवरूनच माघारी पाठवले

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत येताच त्यांनी दुसऱ्या देशातून अमेरिकेत येणाऱ्या लोकांच्या चिंतेत भर टाकली आहे. अमेरिकेत येणाऱ्यांची संख्या मर्यादित करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने अनेक कठोर आदेश लागू केलेत. त्यात जन्मजात नागरिकता मिळण्याचा अधिकारही संपुष्टात आला आहे. त्यात अमेरिकेत राहणारे आणि अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. न्यूजर्सीच्या नेवार्क एअरपोर्टवर झालेल्या एका प्रकारानं चिंतेत वाढ केली आहे.

बी१/बी२ व्हिजिटर व्हिसावर आपल्या मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या भारतीय जोडप्याला रिटर्न तिकिट न दाखवल्याने अमेरिकेत एन्ट्री रोखली. या जोडप्याला विमानतळावरूनच भारतात परतावं लागले आहे. अमेरिकेत २०२५ च्या इमिग्रेशन नियमांत झालेल्या बदलांचा हवाला देत अधिकाऱ्यांनी भारतीय जोडप्याला अमेरिकेत प्रवेश दिला नाही. त्यांना विमानतळावरून मायदेशी परतण्यास भाग पाडले. अमेरिकेत व्हिजिटर व्हिसावर येणाऱ्यांकडे त्यांचं रिटर्न तिकिट दाखवणे बंधनकारक ठरवलं आहे.

न सांगता नियम बदलल्यानं संभ्रमाची स्थिती

रिटर्न तिकिट आवश्यक बनवल्याने प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे. भारतीय जोडप्याने म्हटलं की, जर आमच्याकडे रिटर्न तिकिट नसेल तर अमेरिकेत आम्हाला एन्ट्री मिळणार नाही ही माहिती आमच्याकडे नव्हती. याबाबत कुठलीही पूर्वकल्पनाही देण्यात आली नाही. त्यामुळे अमेरिकेत येणाऱ्या इतर देशातील प्रवाशांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. हा नियम अचानक लागू झाल्याने आणखीही नियम कठोर बनवले जाऊ शकतात असा विचार प्रवाशांमध्ये आला. अमेरिकन इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून पूर्वसूचना न दिल्याने लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, अमेरिकेत इमिग्रेशन नियमात झालेले बदल पाहता भारत सरकारने प्रवाशांसाठी अतिरिक्त सतर्कता बाळगण्याचा आग्रह केला आहे. अमेरिकेत जाण्यापूर्वी प्रवाशांनी आपल्याकडील सर्व कागदपत्रे आणि रिटर्न तिकिट आणि ट्रॅव्हल प्लॅन सोबत ठेवण्याची काळजी घ्यावी. नव्या इमिग्रेशन नियमांसाठी सरकारी वेबसाईट आणि ट्रॅव्हल एजेंटकडून माहिती घ्यावी. 

Web Title: An Indian couple visiting their children in the US were reportedly denied entry at America Newark Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.