भारताच्या एका अॅक्शनने पाकिस्तानला घाम फुटला! UNमध्ये केली गयावया; म्हणाले,'सिंधू जल करार पुन्हा सुरु करा!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 20:13 IST2025-11-07T20:12:37+5:302025-11-07T20:13:02+5:30
भारताने सिंधू जल करारावर घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसल्याचे आता उघडपणे दिसत आहे.

भारताच्या एका अॅक्शनने पाकिस्तानला घाम फुटला! UNमध्ये केली गयावया; म्हणाले,'सिंधू जल करार पुन्हा सुरु करा!'
भारताने सिंधू जल करारावर घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसल्याचे आता उघडपणे दिसत आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत धाव घेतली असून, भारताला हा महत्त्वाचा जल करार त्वरित पूर्ववत करण्याची गयावया केली आहे. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी भारतावर अनेक बिनबुडाचे आरोप करत स्वतःला पीडित दाखवण्याचा प्रयत्न केला. भारताने एकतर्फी कारवाई करत हा करार निलंबित केला आहे आणि भारत जाणूनबुजून पाण्याचा वापर शस्त्रासारखा करत असल्याचा खोटा दावा त्यांनी केला.
लाखों लोकांचे जीवन धोक्यात
पाकिस्तानी राजदूत इफ्तिखार अहमद यांनी संयुक्त राष्ट्रात सांगितले की, "भारताचा हा एकतर्फी निर्णय सिंधू जल कराराच्या मूळ भावनेला धक्का पोहोचवतो. अन्न आणि ऊर्जा सुरक्षेसाठी या पाण्यावर अवलंबून असलेल्या लाखो पाकिस्तानी लोकांचे जीवन यामुळे धोक्यात आले आहे."
ते म्हणाले की, या कृतीमुळे केवळ एका देशाचे नुकसान होत नाहीये, तर आंतरराष्ट्रीय जल कायद्याचेही उल्लंघन केले जात आहे.
६० वर्षांचा करार
इफ्तिखार अहमद यांनी सांगितले की, १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेल्या या कराराने सहा दशकांहून अधिक काळ दोन्ही देशांतील पाण्याचे समान वाटप नियंत्रित केले आहे. या करारानुसार सिंधू नदीच्या खोऱ्यातील सहा नद्यांचे पाणी वाटले गेले आहे. यातील पश्चिम नद्यांवर पाकिस्तानचा तर पूर्व नद्यांवर भारताचा नियंत्रण आहे.
'पहलगाम हल्ल्या'नंतर भारताने घेतले होते मोठे पाऊल
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत सिंधू जल कराराला निलंबित करण्यासह अनेक कठोर पाऊले उचलली होती. या कठोर भूमिकेमुळे आपला मोठा तोटा होणार असल्याची जाणीव आता पाकिस्तानला झाली आहे. म्हणूनच तो वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून हा करार पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहे. पाकिस्तानी राजदूत म्हणाले की, "करारातील कोणताही नियम एकतर्फी निलंबन किंवा सुधारणेची परवानगी देत नाही, त्यामुळे आम्हाला कराराचा आदर आणि सामान्य कामकाज लवकर पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे."