अमेरिकेची कबुली!'आमचे तळ उद्ध्वस्त झाले, आता भारतावर अवलंबून राहावे लागणार; माजी अमेरिकन कर्नलचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 09:51 IST2026-03-05T09:36:17+5:302026-03-05T09:51:47+5:30

जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन म्हणाले, "अमेरिकन सैन्याला धोका आहे. काही इराणी हवाई हल्ले अजूनही आपल्या तळापर्यंत पोहोचू शकतात, असे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी कबुल केले.

America's confession 'Our bases were destroyed, now we will have to depend on India; Former American Colonel's big claim | अमेरिकेची कबुली!'आमचे तळ उद्ध्वस्त झाले, आता भारतावर अवलंबून राहावे लागणार; माजी अमेरिकन कर्नलचा मोठा दावा

अमेरिकेची कबुली!'आमचे तळ उद्ध्वस्त झाले, आता भारतावर अवलंबून राहावे लागणार; माजी अमेरिकन कर्नलचा मोठा दावा

इराणवरअमेरिका आणि इस्त्रायलने हल्ले केले आहेत. या हल्ल्यात इराणच्या प्रमुख नेत्यांसह महत्वाच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हे युद्ध अजूनही सुरूच आहे. दरम्यान, अमेरिकेच्या एका माजी लष्करी कर्नलने मोठा दावा केला आहे. इराण जोरदारपणे लढत आहे. अनेक अमेरिकन तळ उद्ध्वस्त झाले आहेत, अमेरिका युद्धासाठी भारत आणि त्यांच्या तळांवर अवलंबून आहे, असा मोठा दावा केला. दरम्यान, यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने किंवा भारताने अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. 

'चीन आणि रशिया इराणला मदत करत आहेत. चीन आणि रशिया प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत आणि सरकारशी संपर्कात आहेत. ते उपग्रह गुप्तचर माहिती पुरवत आहेत, यामुळे इराणला काही प्रमाणात यश मिळाले आहे, असंही माजी अमेरिकन आर्मी कर्नल डग्लस मॅकग्रेगर म्हणाले.

"आमचे सर्व तळ नष्ट झाले आहेत. आमचे बंदर प्रतिष्ठान नष्ट झाले आहेत. आम्हाला मुळात भारत आणि भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागत आहे. मला वाटते या युद्धात इराण पुढे आहे, असंही माजी अमेरिकन आर्मी कर्नल डग्लस मॅकग्रेगर म्हणाले.

अमेरिकेने कबुल केले

"काही इराणी हवाई हल्ले अजूनही आमच्या तळांपर्यंत पोहोचू शकतात,अशी कबुली अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी बुधवारी दिली. अमेरिकेकडे युद्धासाठी पुरेशी उपकरणे आहेत, असंही ते म्हणाले.

इस्रायलसह इराणवर हल्ले केल्यानंतर काही दिवसांनी, हेगसेथ यांनी पेंटागॉन येथे पत्रकारांना सांगितले की, अमेरिकेने पश्चिम आशियातील अमेरिकन सैन्य आणि मित्र राष्ट्रांचे संरक्षण करण्यासाठी हवाई संरक्षण प्रणाली सुधारण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आपण सर्वकाही थांबवू शकतो, परंतु हल्ला करण्यापूर्वी आपण शक्य तितके संरक्षण आणि संरक्षण निश्चित केले आहे, असे ते म्हणाले.

Web Title : अमेरिका ने माना: अड्डे नष्ट, अब भारत पर निर्भर: पूर्व कर्नल

Web Summary : पूर्व अमेरिकी कर्नल का दावा है कि ईरानी हमलों ने अमेरिकी अड्डों को नष्ट कर दिया। परिणामस्वरूप, अमेरिका अब समर्थन और बंदरगाहों के लिए भारत पर निर्भर है। अमेरिकी रक्षा सचिव ने माना कि कुछ ईरानी हमले अभी भी अमेरिकी अड्डों तक पहुँच सकते हैं। चीन और रूस कथित तौर पर ईरान की सहायता कर रहे हैं।

Web Title : US admits bases destroyed, now relies on India: Ex-Colonel

Web Summary : A former US Colonel claims Iranian attacks destroyed American bases. Consequently, the US now depends on India for support and ports. The US Secretary of Defense admitted some Iranian strikes could still reach US bases. China and Russia are reportedly aiding Iran.