American minister alex azar leads highest level us delegation reaches taiwan | अमेरिकन मंत्र्यानं तब्बल 41 वर्षांनंतर तैवानमध्ये ठेवलं पाऊल, चीनचा तिळपापड

अमेरिकन मंत्र्यानं तब्बल 41 वर्षांनंतर तैवानमध्ये ठेवलं पाऊल, चीनचा तिळपापड

ठळक मुद्देचीनने यापूर्वीच अजार यांच्या या भेटीसंदर्भात विरोध दर्शवला आहे. तैवानसोबत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार अमेरिकातैवानकडे स्वतःचे सैन्यही आहे. त्याला अमेरिकेचे समर्थनदेखील आहे.

तैपेई - अमेरिकेचे आरोग्यमंत्री अ‍ॅलेक्स अजार यांच्या नेतृत्वात रविवारी एका चमूने तैवानला भेट दिली. अमेरिका आणि तैवान यांचे 1979 मध्ये औपचारिक द्विपक्षीय संबंध संपल्यानंतर, एखाद्या अमेरिकन मंत्र्याने तैवानला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनने यापूर्वीच अजार यांच्या या भेटीसंदर्भात विरोध दर्शवला आहे. तसेच ही भेट म्हणजे विश्वासघात असल्याचेही चीनने म्हटले आहे.

तैवानच्या राष्ट्रपतींना भेटनार अमेरिकन मंत्री -
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी समन्वयाच्या दृष्टीने अजार तैवानच्या राष्ट्रपती साई इंग-वेन आणि आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतील. अजार तीन दिवसांच्या तैवान दौऱ्यावर आहेत. व्हायरसचे केंद्र असलेल्या चीनच्या अगदी जवळ असूनही या बेटावर कोरोनाबाधितांची संख्या 500 पेक्षाही कमी आहे, तर फक्त सात जणांचाच मृत्यू झाला आहे. याचे संपूर्ण श्रेय तैवानच्या आरोग्य यंत्रणेला जाते. 

तैवानसोबत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार अमेरिका -
अजार यांच्या कार्यालयाने म्हटले आहे, की ते कोरोना, जागतीक आरोग्य आणि वैद्यकीय उपकारणांचा पुरवठा तसेच तंत्रज्ञानासंदर्भात तैवानच्या भूमिकेवर चर्चा करतील. यावर चिनी सरकारी माध्यमाने तैवान आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संबंधांवरून दोन्ही देशांना इशारा दिला आहे. ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे, की चीनने आपल्या सैन्य शक्तीत एवढी वाढ केली आहे, की तैवानने अमेरिकेकडून कितीही सैन्य सामग्री आणि शस्त्र खरेदी केले, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

तैवानला आपला भाग मानतो चीन -
चीन तैवानला आपला भाग मानतो. एवढेच नाही, तर चिनी कम्यूनिस्ट पार्टी अनेकदा सैन्य कारवाईसंदर्भातही भाष्य करत असते. तैवानकडेही आपले स्वतःचे सैन्यही आहे. त्याला अमेरिकेचे समर्थनदेखील आहे. मात्र, डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी सत्तेत आल्यापासून तैवानचे चीनसोबतचे संबंध अधिक खराब झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: आता राज्यात आवाजाच्या सहाय्याने होणार कोरोना टेस्ट, आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट

व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम

CoronaVaccine : लठ्ठ लोकांवर परिणामकारक ठरणार नाही कोरोना लस? संशोधकांनी व्यक्त केली शक्यता

अयोध्येत बाबराच्या नावानं मशीद बनणार नाही, मुख्यमंत्री योगींना निमंत्रण देण्यावरही निर्णय

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: American minister alex azar leads highest level us delegation reaches taiwan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.