अमेरिकेत अनिवासी भारतीय पोलिसाची हत्या; नाताळच्या रात्री घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 14:12 IST2018-12-27T14:11:34+5:302018-12-27T14:12:07+5:30
घटनेच्या काही काळानंतर रेडिओवर रोनिलच्या मृत्यूची बातमी सांगण्यात आली.

अमेरिकेत अनिवासी भारतीय पोलिसाची हत्या; नाताळच्या रात्री घटना
न्युयॉर्क : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये अनिवासी भारतीय पोलिसाचा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रोनिल सिंह (वय 33) असे या अधिकाऱ्याचे नाव असून नाताळच्या रात्री सेवा बजावत असताना ही घटना घडली. ओव्हरटाईम ड्युटीवेळी ट्रॅफिकचे नियोजन करत असताना अज्ञाताने गोळी झाडली.
घटनेच्या काही काळानंतर रेडिओवर रोनिलच्या मृत्यूची बातमी सांगण्यात आली. गोळी लागल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.
पोलिस येण्याआधीच हल्लेखोराने घटनास्थळीच कार सोडून पलायन केले होते. पोलिसांनी संशयित आणि वाहनाचे सीसीटीव्ही फुटेज जारी करून लोकांना त्याची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. रोनिल हा सात वर्षांपासून न्यूमेन पोलिस विभागात होते. त्याच्या पश्चात पत्नी आणि पाच महिन्यांचा मुलगा आहे.