अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:09 IST2025-08-28T16:05:38+5:302025-08-28T16:09:55+5:30

अलास्कामध्ये अमेरिकन हवाई दलाचे F-35 जेट विमान कोसळले. जेटमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी ५० मिनिटे हवेत कॉन्फरन्स कॉल सुरू होता.

American fighter jet catches fire in mid-air, F-35 aircraft crashes in Alaska | अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले

अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले

अलास्कामध्ये F-35 या लढाऊ विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. F-35 या लढाऊ विमानाचा अमेरिकेला अभिमान असल्याचे बोलले जाते.  या अपघातापूर्वी, पायलटने विमान वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. विमानातील समस्या दूर करण्यासाठी, पायलटने लॉकहीड मार्टिनच्या पाच अभियंत्यांसह हवेत ५० मिनिटे कॉन्फरन्स कॉल केला. 

५० मिनिटांमध्ये प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे अखेर पायलटने पॅराशूटच्या मदतीने विमानातून उडी मारली. त्यानंतर, अलास्कातील धावपट्टीवर जेट कोसळले. अपघाताचे कारण जेटच्या हायड्रॉलिक सिस्टममध्ये बर्फ तयार होणे असल्याचे सांगण्यात आले. यामुळे लँडिंग गियर जाम झाला होता.

शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story

यामुळे जेट नियंत्रणाबाहेर गेले

उड्डाण सुरू होताच, पायलटने गियर मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण तो डाव्या बाजूला अडकला. पुन्हा गियर खाली करण्याचा प्रयत्नही अयशस्वी झाला. जेटच्या सेन्सरने विमान उतरल्याचे चुकीचे संकेत दिले, यामुळे जेट नियंत्रणाबाहेर गेले. पायलटने हवेतच अभियंत्यांसह कॉन्फरन्स कॉल सुरू केला आणि सुमारे ५० मिनिटे बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, अडकलेले गियर दुरुस्त करण्यासाठी 'टच अँड गो' लँडिंगचा दोनदा प्रयत्न करण्यात आला, पण दोन्ही वेळा तो अयशस्वी झाला. शेवटी, सेन्सरच्या चुकीच्या सिग्नलमुळे, जेट पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेले आणि पायलटला पॅराशूटने उडी मारावी लागली.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये , जेट आकाशात फिरताना आणि आगीच्या गोळ्यात रूपांतरित होताना दिसत होते. यानंतर जेट खाली पडले असून मोठी आग लागली.  जेटच्या पुढच्या आणि उजव्या लँडिंग गियरच्या हायड्रॉलिक फ्लुइडमध्ये एक तृतीयांश पाणी होते, हे -१८ अंश सेल्सिअसच्या थंडीत गोठले. या बर्फामुळे गियर जाम झाला होता, असं तपासणीत समोर आले.

अपघातानंतर नऊ दिवसांनी, त्याच तळावरील दुसऱ्या जेटलाही 'हायड्रॉलिक आयसिंग'ची समस्या सुरू होती.त्या जेटने सुरक्षितपणे लॅन्डींग केले. 

लॉकहीड मार्टिनचा F-35 अनेक दिवसापासून वादात आहे. त्याची मोठ्या प्रमाणात किंमत गडबडीने केलेले उत्पादन यामुळे त्यावर टीका सुरू आहे.

Web Title: American fighter jet catches fire in mid-air, F-35 aircraft crashes in Alaska

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.