Boxer Isiah Jones: रिंगमध्ये भल्या-भल्यांना पाणी पाजलं, पण कौटुंबिक लढाई हरला; भावानेच केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 20:38 IST2022-09-22T20:37:16+5:302022-09-22T20:38:38+5:30

Boxer Isiah Jones: अमेरिकेचा स्टार बॉक्सर इसिया जोन्सची त्याच्या भावाने हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

American Boxer Isiah Jones murdered by his brother by firing | Boxer Isiah Jones: रिंगमध्ये भल्या-भल्यांना पाणी पाजलं, पण कौटुंबिक लढाई हरला; भावानेच केली हत्या

Boxer Isiah Jones: रिंगमध्ये भल्या-भल्यांना पाणी पाजलं, पण कौटुंबिक लढाई हरला; भावानेच केली हत्या

Boxer Isiah Jones: अमेरिकेचा स्टार बॉक्सर इसिया जोन्सने(Isiah Jones) रिंगमध्ये भल्या-भल्यांना पराभवाची धूळ चारली. मोठमोठे बॉक्सरही जोन्ससमोर थरथर कापायचे. पण, रिंगमध्ये विरोधकांना पराभूत करणारा हा 28 वर्षीय बॉक्सर आपल्याच घरात पराभूत झाला. इसिया जोन्सला त्याच्याच सख्या भावाने गोळ्या घालून ठार केले. कौटुंबिक वादातून या स्टार बॉक्सरची हत्या करण्यात आली. 

जोन्सला सोमवारी सायंकाळी त्याच्या भावाने मिशिगनच्या डेट्रॉईटमध्ये गोळ्या घातल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी जोन्सच्या भावावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जोन्सच्या निधनाने बॉक्सिंग जगतावर शोककळा पसरली आहे. दिग्गज खेळाडून आणि चाहते सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.

उगवता तारा होता जोन्स 
28 वर्षीय जोन्स हा एक उगवता स्टार बॉक्सर होता. एवढ्या लहान वयात जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. इसिया जोन्सने 2016 राष्ट्रीय गोल्डन ग्लोव्हज जिंकले होते. यानंतर त्याने रोशॉन आणि केनेथ रॉस यांच्या मार्गदर्शनाखाली पहिले आठ व्यावसायिक सामने जिंकले. यादरम्यान तो त्याच्या सर्वोच्च टप्प्यात होता, परंतु त्यानंतर त्याच्या कामगिरीत काहीशी घसरण झाली. त्याला अनेक सामन्यात पराभवाचा सामनाही करावा लागला. जोन्सने शेवटचा सामना अँड्र्यू मर्फीविरुद्ध जुलैमध्ये खेळला होता.

Web Title: American Boxer Isiah Jones murdered by his brother by firing