शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

VIDEO: १५९ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या इंजिनाने घेतला पेट; इमर्जन्सी लँडिंगमुळे वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:19 IST

इंजिनमध्ये आग लागल्यानंतर अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाचे येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

American Airlines Plane: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या जखमा ताज्या असतानाच आणखी एका विमानाचा अपघात होता होता वाचला. अमेरिकेत लास वेगास येथे बुधवारी सकाळी अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाचे येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. उड्डाणानंतर लगेचच विमानाच्या इंजिनला आग लागल्यामुळे विमान परत बोलवण्यात आलं. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे दिसत आहे. 

टेकऑफ दरम्यान विमानाच्या इंजिनला आग लागल्याने अमेरिकन एअरलाइन्सच्या एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. इंजिनमध्ये आगीचे लोळ पाहून पायलटने एटीसीशी संपर्क साधला आणि विमानाचे विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. टेकऑफ केल्यानंतर १० मिनिटांतच विमान परतले,  इंजिनमध्ये आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली होते. आपत्कालीन लँडिंगनंतर विमानाच्या आपत्कालीन गेटमधून त्यांना बाहेर काढण्यात आल्यानंतर ते खूप घाबरले होते. सर्व प्रवासी सुरक्षित असले तरी, अनेक प्रवाशांना डॉक्टरांकडून समुपदेशन घ्यावं लागल्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअरलाइनने दिलगिरी व्यक्त केली आहे.

अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट १६६५ ने लास वेगासमधील हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. सकाळी ८:१० वाजता उड्डाण करणारे हे विमान उत्तर कॅरोलिनातील शार्लोट येथे उतरणार होते. हे विमान एअरबस ए३२१ होते जे उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनला आग लागल्यामुळे १० मिनिटांत विमानतळावर परतले. इंजिनमधून येणारा धूर लोकांनीही पाहिला आणि विमानतळ कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. विमानतळ कर्मचाऱ्यांनी एटीसीद्वारे फ्लाइट पायलटला इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती दिली. पायलटने क्रू मेंबर्स आणि प्रवाशांना सतर्क केले. आपत्कालीन लँडिंगसाठी तातडीने एटीसीशी संपर्क साधला.

परवानगी मिळताच वैमानिकाने विमान सुरक्षितपणे उतरवले. या विमानात १५३ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन आणि अमेरिकन एअरलाइन्सने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. "विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवले जाईल. ज्यांना परतफेड हवी आहे ते एअरलाइन अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. क्रू मेंबर्सनी कठीण काळातही समयसूचकता दाखवली, याबद्दल आम्ही टीमचे आभारी आहोत. अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत," असं कंपनीकडून सांगण्यात आले.

टॅग्स :AmericaअमेरिकाairplaneविमानSocial Viralसोशल व्हायरल