युद्धास मनाई करण्यासाठी अमेरिकेत होणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 04:07 IST2020-01-10T04:07:07+5:302020-01-10T04:07:19+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्या देशाबरोबर युद्ध करण्यास मनाई करणारे मतदान डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज करणार आहे,

युद्धास मनाई करण्यासाठी अमेरिकेत होणार मतदान
वॉशिंग्टन : इराणच्या लष्करप्रमुखाला ठार मारण्याचा आदेश दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्या देशाबरोबर युद्ध करण्यास मनाई करणारे मतदान डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज करणार आहे, असे सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी म्हटले. पेलोसी म्हणाल्या की, डेमोक्रॅटस्ना वाटणाऱ्या काळजीचे पूर्ण समाधान बुधवारी लोकप्रतिनिधींना बंद दाराआडच्या बैठकीत परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीने झालेले नाही. त्यामुळे डेमोक्रॅटस् विरोधात मतदान करतील. अमेरिकेच्या लोकांना सुरक्षित ठेवणारे सुसंगत धोरण माझ्याकडे नाही हे ट्रम्प यांनी स्पष्ट केल्याचे पेलोसी यांनी निवेदनात म्हटले.