अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 17:41 IST2025-09-06T17:40:54+5:302025-09-06T17:41:50+5:30
यापूर्वी अमेरिकेने १९९२ मध्ये रशियाकडून अंडी खरेदी केली होती...

अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
रशियन अर्थव्यवस्थेला हादरा देण्याचा आणि ती पंगू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेवरच आता रशियासोबत व्यापार कराण्याची वेळ आली आहे. खरेतर, अमेरिकेने या वर्षाच्या जुलै महिन्यात, गेल्या अनेक वर्षांनंतर, पहिल्यांदाच रशियाकडून कोंबडीची अंडी अयात केली आहेत. रशियाच्या आरआयए नोवोस्ती या राज्य वृत्तसंस्थाने यूएस स्टॅटिस्टिकल सर्व्हिसच्या आकडेवारीचा हवाला देत ही माहिती दिली प्रसिद्ध केली आहे. महत्वाचे म्हणजे, ही आयात ३२ वर्षांनंतर पहिल्यांदाच झाली असल्याचेही बोलले जात आहे. यापूर्वी अमेरिकेने १९९२ मध्ये रशियाकडून अंडी खरेदी केली होती.
संबंधित वृत्तानुसार, अमेरिकेने जुलै महिन्यात रशियाकडून कोंबडीची अंडी खरेदी करण्यासाठी 4.55 लाख डॉलर (जवळपास 3.8 कोटी रुपये) खर्च केले आहेत. खरे तर, अमेरिकेत बर्ड फ्लूच्या साथीमुळे पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसला आहे. यामुळे अंड्यांचा पुरवठा प्रभावित झाला आहे. परिणामी अमेरिकेवर रशियाकडून अंडी मागवण्याची वेळ आली आहे.
बर्ड फ्लूमुळे संकट आणि महागाई -
गेल्या 2025 च्या सुरुवातीला पसरलेल्या बर्ड फ्लूमुळे लाखो कोंबड्या प्रभावित झाल्या आहेत. सीएनएनच्या वृत्तानुसार, जानेवारी महिन्यात परिस्थिती एवढी गंभीर होती की, अनेक दुकानांना अंडी खरेदीवर मर्यादा घालाव्या लागल्या होत्या. फेब्रुवारीपर्यंत एक डझन अंड्यांची किंमत 7 डॉलरपर्यंत गेली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांत किंमती कमीही झाल्या आहेत. मात्र, जुलै 2025 मध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत अंडी 16.4% ने महाग आहेत.
महत्वाचे म्हणजे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी या संकटासाठी माजी बायडेन प्रशासनाला जबाबदार ठरवले आहे. त्यांनी आरोप केला की, बायडेन यांनी पद सोडण्यापूर्वी सुमारे ८० लाख कोंबड्यांचा अनावश्यक बळी दिला होता. त्यामुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाली.