1991 मध्ये झाली होती महिलेची हत्या, 30 वर्षांनंतर सापडला तिचा मारेकरी; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 09:28 IST2023-08-02T09:28:17+5:302023-08-02T09:28:49+5:30
Vicki Jhonson Sensational Murder Case: विकी जॉनसन नावाच्या या महिलेचा मृतदेह सीसाइड भागातील डॉर्विन स्ट्रीटवर आढळून आला होता. त्यावेळी पोलिसांनी सांगितलं होतं की, आधी महिलेचा गळा दाबण्यात आला आणि नंतर तिला जाळण्यात आलं होतं.

1991 मध्ये झाली होती महिलेची हत्या, 30 वर्षांनंतर सापडला तिचा मारेकरी; पण...
Vicki Jhonson Sensational Murder Case: अमेरिकन पोलिसांनी 30 वर्ष जुन्या एका केसचा खुलासा केला आहे. हे सगळं डीएनए मॅच झाल्यामुळे शक्य होऊ शकलं. सी साइड फायर पोलिसांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली. पोलिसांनुसार, 30 वर्षाआधी एका 34 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तर धक्कादायक बाब समोर आली होती.
विकी जॉनसन नावाच्या या महिलेचा मृतदेह सीसाइड भागातील डॉर्विन स्ट्रीटवर आढळून आला होता. त्यावेळी पोलिसांनी सांगितलं होतं की, आधी महिलेचा गळा दाबण्यात आला आणि नंतर तिला जाळण्यात आलं होतं. या केसची अमेरिकेत खूप चर्चा झाली होती. लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा उठवला गेला होता. 30 वर्षांनंतर जॉनसनच्या शरीरावरील आरोपीच्या नखांच्या खूणांवरून पोलिसांनी ही केस सॉल्व केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जॉनसनच्या मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला होता. साधारण तीन दशकं ही केस रहस्य बनून होती. या केसची चौकशी जेव्हा पुढे गेली तेव्हा एका व्यक्तीवर संशय आला. पण त्याला दोषी ठरवण्यासाठी ठोस पुरावा नव्हता. पोलिसांनी नंतर डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. कोर्टाच्या आदेशानंतर डीएनए टेस्ट झाली तेव्हा आरोपीची ओळख पटली.
आरोपीचंही झालं निधन
पोलिसांनुसार, घटनास्थळावर जेव्हा कोणतेही ठोस पुरावे सापडले नाही तेव्हा कोर्टात डीएनए टेस्टचा अर्ज करण्यात आला. डीएनए टेस्टनंतर समजलं की, आरोपीचं नाव फ्रैंक लुईस मक्लर आहे. ज्याचं 2021 मध्ये वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं. पण हे समजू शकलं नाही की, जॉनसन आणि त्याच्यात काय नातं होतं.
पोलीस म्हणाले की, डीएनए टेस्टमधून समोर आलं की, पीडित आणि आरोपी यांच्यात शारीरिक संघर्ष झाला होता आणि ती तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढली. जॉनसनच्या शरीरावर मक्लरच्या बोटांच्या खूणा आढळून आल्या होत्या आणि त्यावरूनच हे सिद्ध झालं की, आरोपी कोण होता. हत्येचा उद्देश आजही समजू शकलेला नाही.