भारत चीन चकमक; सीमेवर अमेरिकेची बारीक नजर, अशी आली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:18 AM2020-06-17T11:18:36+5:302020-06-17T11:30:47+5:30

भारत आणि चीनदरम्यान असलेल्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर या चकमकीत चीनचेही 43 सैनिक गंभीररित्या जखमी झाल्याचे आणि त्यातील काही जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

America said closely monitoring the situation between india and china on border  | भारत चीन चकमक; सीमेवर अमेरिकेची बारीक नजर, अशी आली पहिली प्रतिक्रिया

भारत चीन चकमक; सीमेवर अमेरिकेची बारीक नजर, अशी आली पहिली प्रतिक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्देया चकमकीत चीनचेही 43 सैनिक गंभीररित्या जखमी झाल्याचे आणि त्यातील काही जण ठार झाल्याचे वृत्त आहे.चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय लष्कराच्या जवानांसोबत झटापट करून त्यांना डिवचले - अमेरिकासंयुक्त राष्ट्राचे शांतता राखण्याचे आवाहन

नवी दिल्ली/वॉशिंग्टन :भारत आणि चीनदरम्यान असलेल्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर या चकमकीत चीनचेही 43 सैनिक गंभीररित्या जखमी झाल्याचे आणि त्यातील काही जण ठार झाल्याचे वृत्त आहे. तसेच एएनआय वृत्त संस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीनंतर चार भारतीय जवानांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे.

अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया -
भारत आणि चीनदरम्यानच्या तणावपूर्ण परिस्थितीवर अमेरिकेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने म्हटले आहे, लडाख सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, आम्ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) भारत आणि चिनी सैन्यातील तणावाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. भारतीय लष्कराने मंगळवारी एक निवेदन जारी करून गलवान खोऱ्यात 20 जवानांना हौतात्म्य आल्याचे सांगितले होते. आम्ही त्यांच्या कुटूंबीयांप्रती शोक व्यक्त करतो.

जाणून घ्या, काय आहेत पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले 'आमने-सामने'

अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी म्हटले होते, की भारत आणि चीन दोघांनीही डी-एस्कलेट करन्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच आम्हीही सद्य स्थितीत शांततापूर्ण मार्गाचे समर्थन करतो. ते म्हणाले 2 जूनला फोनवरून राष्ट्रपती ट्रम्प आणि पीएम मोदी यांनी भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर चर्चा केली आहे. 

India China Dispute : गलवान खोऱ्यात चीननं पसरवलय जाळं; हळू-हळू अशी वाढवली ताकद

काय म्हणतायंत अमेरिकन माध्यमं -
अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये म्हणण्यात आले आहे, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय लष्कराच्या जवानांसोबत झटापट करून त्यांना डिवचले आहे. 15 जूनला रात्री उशिरा झालीली हिंसक झटापट म्हणजे, चिनी सैनिकांनी डी-एस्कलेशनदरम्यान असलेली स्थिती एकतर्फी बदलन्याचा प्रयत्न केल्याचा परिणाम आहे.

भारताचे तीन जवान शहीद, चीनचे पाच सैनिक ठार; घाबरलेला चीन म्हणतो- एकतर्फी पाऊल उचलू नका 

संयुक्त राष्ट्राचे शांतता राखण्याचे आवाहन -
संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे प्रवक्ता एरी कनेको यांनी पत्रकार परिषदेत, 'भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकीसंदर्भात आणि मृत्यूसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. आम्ही या दोन्ही देशांना शांतता बाळगण्याचे आवाहन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.'

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण

 

Web Title: America said closely monitoring the situation between india and china on border 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.