America-Russia: एकीकडे अमेरिकेने व्हेनेजुएलावर तीव्र लष्करी कारवाई करत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतले, तर दुसरीकडे अमेरिका आणि रशियामध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू आहे. रशियन झेंड्याखाली चालणाऱ्या ‘मैरिनेरा’ तेलवाहू टँकरचा US Coast Guard पाठलाग करत असताना रशियाने त्याच्या संरक्षणासाठी चक्क पाणबुडी आणि नौदल जहाजे तैनात केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. हा टँकर रशियाच्या मुरमांस्क बंदराकडे जात आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, ‘बेला-1’ नावाचा तेलवाहू टँकर व्हेनेझुएलामधून कच्चे तेल भरून निघाला होता. अमेरिकेने तो रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर जहाज उत्तर दिशेने पळाला. त्यानंतर या टँकरने आपले नाव बदलून ‘मैरिनेरा’ असे केले. सध्या हा टँकर आइसलँडच्या सुमारे 300 मैल दक्षिणेला असून, रशियाच्या दिशेने प्रवास करत आहे. दरम्यान, रशियाने अमेरिकेला पाठलाग थांबवण्यास सांगितले, पण अमेरिकन कोस्ट गार्ड मागे न हटल्याने रशियाने थेट लष्करी हस्तक्षेप करत टँकरला संरक्षण (एस्कॉर्ट) देण्यास सुरुवात केली. रशियन सरकारी माध्यम RTने टँकरवरील व्हिडिओ प्रसारित केला असून, त्यात अमेरिकन जहाज स्पष्टपणे पाठलाग करताना दिसत आहे.
‘शॅडो फ्लीट’मुळे संघर्षाची ठिणगी
हा संपूर्ण वाद तथाकथित ‘शॅडो फ्लीट’मुळे निर्माण झाला आहे. शॅडो फ्लीट म्हणजे अस्पष्ट मालकी असलेले टँकर. अशाप्रकारचे टँकर्स आंतरराष्ट्रीय निर्बंध असलेल्या देशांसाठी तेल वाहतूक करतात. तज्ज्ञांच्या मते, अशा शेकडो जहाजांच्या मदतीने रशियन अर्थव्यवस्था निर्बंध असूनही चालवली जाते. ‘मैरिनेरा’ टँकरवर 2024 मध्ये अमेरिकेने निर्बंध लादले होते. आता यामुळेच दोन्ही देशांत वाद सुरू आहे.
ट्रम्प प्रशासनाचा निर्णय अन् त्याचे पडसाद
डिसेंबर 2025 मध्ये डोनाल्ड यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी शॅडो फ्लीटविरोधात कडक पावले उचलली होती. याच धोरणाचा भाग म्हणून अशा टँकरवर कारवाई सुरू झाली. रशियाने हा मुद्दा थेट आपल्या राष्ट्रीय संप्रभुतेशी जोडला आहे. आंतरराष्ट्रीय पाण्यात रशियन झेंड्याखालील जहाजावर कारवाई केल्यास तो गंभीर संघर्ष ठरू शकतो, असा इशारा मॉस्कोने दिला आहे.
अमेरिका अडचणीत का?
अमेरिकेने याआधी अशा अनेक टँकरवर कारवाई करत त्यांना जप्त केले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पाण्यात रशियन झेंड्याखाली चालणाऱ्या जहाजावर कारवाई करणे कायदेशीर आणि लष्करीदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. जर अमेरिकेने जबरदस्तीने टँकरवर चढाई (बोर्डिंग) केली, तर थेट अमेरिका-रशिया संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. Wall Street Journalनुसार, अशा घटना भविष्यात अधिक वाढू शकतात. कारण आता शॅडो फ्लीटमधील अनेक जहाजे थेट रशियन झेंडा लावून कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत.
Web Summary : US Coast Guard pursued a Russian tanker, prompting Moscow to deploy naval escorts. The tanker, suspected of carrying sanctioned Venezuelan oil, is part of the 'shadow fleet'. This escalates tensions amid US efforts to curb oil trade with sanctioned nations, risking direct conflict.
Web Summary : अमेरिकी कोस्ट गार्ड ने रूसी टैंकर का पीछा किया, जिसके बाद मॉस्को ने नौसेना भेजी। वेनेजुएला से तेल ले जा रहा टैंकर 'शैडो फ्लीट' का हिस्सा है। अमेरिका के प्रतिबंधों के बीच तनाव बढ़ा, सीधे संघर्ष का खतरा।