शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:49 IST

ईश्वराच्या मदतीने, आपण आणखी बरेच टप्पे गाठणार आहोत, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे...

इस्रायलनेइराणवर केलेल्या हल्ल्याची संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. या हवाई हल्ल्यात इस्रायलने शुक्रवारी इराणच्या अण्वस्त्र तळांवर, मिसाइल्स आणि लष्करी तळांवर  हल्ला करण्यासाठी ‘ऑपरेशन रायझिंग लॉयन’ सुरू केले. या हल्ल्यात इराणचे अनेक लष्करी कमांडर आणि शास्त्रज्ञ मारले गेले आहेत.  यासंदर्भात भाष्य करताना, "आपण एक अत्यंत यशस्वी प्रारंभिक हल्ला केला आहे. ईश्वराच्या मदतीने, आपण आणखी बरेच टप्पे गाठणार आहोत." असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.

इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर, जगातील अनेक देशांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यातील काही देशांनी इस्रायलला तर काही देशांनी इराणला पाठिंबा दिला आहे. तर काही देशांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या देशांत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, चेक रिपब्लिक, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांचा समावेश आहे. याचवेळी, रशिया, चीन, इजिप्त, तुर्की, पाकिस्तान, इंडोनेशिया, इराक, ओमान, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, लेबनॉन, हौथी, हमास, अफगाणिस्तान आदींनी इस्रायलविरुद्ध इराणला पाठिंबा दिला आहे. तर ज्यांनी दोन्ही देशांना संघर्ष कमी करण्याचे आवाहन केले आहे, त्यांत संयुक्त राष्ट्र, भारत, जपान, आयर्लंड, आफ्रिकन युनियन, युरोपियन युनियन, इटली यांचा समावेश आहे.

जॉर्डनने हाणून पाडले इराणी ड्रोन -इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर, दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहोचला आहे. यानंतर, इराणने प्रत्युत्तर देत इस्रायलवर ड्रोन हल्ले केले. मात्र इराणकडून करण्यात आलेले सर्वच्या सर्व ड्रोन हल्ले इस्रायल आणि जॉर्डनच्या सैन्याने यशस्वीपणे हाणून पाडले. इराणी ड्रोन हाणून पाडण्यासाठी जॉर्डनकडून इस्रायली सैन्याला विशेष मदत मिळत आहे. खरे तर, या भागात जॉर्डन हा इस्रायलचा खास सहकारी आहे आणि त्याला सातत्याने मदत करत असतो. जॉर्डनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या सैन्याने आज सकाळच्या सुमारास आपल्या हवाई हद्दीत प्रवेश केलेले अनेक मिसाइल्स रोखले. या मिसाइल आणि ड्रोनच्या सहाय्याने इराणने इस्रायलवर हल्ला केला होता. मात्र जॉर्डनने ते हवेतच  हाणून पाडले. महत्वाचे म्हणजे, जॉर्डनने त्यांची हवाई सीमाही तात्पुरती बंद केली आहे. 

आमची हवाई हद्द म्हणजे, युद्धाचे मैदान नाही - यासंदर्भात भाष्य करताना जॉर्डन म्हणाला, आपण आपले हवाई क्षेत्र युद्धाचे मैदान होऊ देणार नाही आणि आपल्या हवाई हद्दीत कुठल्याही प्रकारचे उल्लंघन सहन करणार नाही. इराण-इस्रायल यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच जॉर्डनचे हे विधान केले आहे. जॉर्डनच्या एका बाजूला इस्रायल आणि त्याने कब्जा केलेला वेस्ट बँक आहे. तर दुसऱ्या बाजूला इराणचा शेजारी इराक आहे. यामुळे इस्रायलवर हल्ला करण्यासाठी इराणच्या दृष्टीने जॉर्डनची हवाई हद्द महत्वाची आहे.

इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचे प्रत्युत्तर - ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्राइलने इराणमध्ये हवाई हल्ले करत अणुकेंद्र, लष्करी तळ, अणुशास्त्रज्ञ आणि बड्या लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्यानंतर, इराणनेही ऑपरेशन प्रॉमिस सुरू करून इस्राइलवर जोरदार प्रतिहल्ला केला असून, इस्राइलच्या जवळपास प्रत्येक भागाला शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे इस्राइलमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना तातडीने तळघरांमध्ये आश्रय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, इस्राइलच्या संरक्षण यंत्रणांनी इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यातील बहुतांश क्षेपणास्त्रं रोखण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र या हल्ल्यात काही इस्राइली नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, या हल्ल्यात 78 जणांचा मृत्यू झाला असून 329 जण जखमी झाल्या आहेत, असे इराणने म्हटले आहे. तर इस्रायलने 20 जण मारले गेल्याची पुष्टी केली आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धAmericaअमेरिकाrussiaरशियाEnglandइंग्लंडFranceफ्रान्सIndiaभारत