अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 20:16 IST2025-06-22T20:16:10+5:302025-06-22T20:16:37+5:30

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेले नियोजन धाडसी आणि जबरदस्त होते. जगाने अमेरिकेची ताकद बघितली. जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बोलतात, तेव्हा जगाने ऐकायला हवे."

America launched 'Midnight Hammer' on Iran, revealed the name of the operation; said, let Trump say it...! | अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!

अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!

अमेरिकेने रविवारी (२२ जून २०२५) पहाटेच्या सुमारास इराणच्या, फोर्दो, नतांज आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केले. यानंतर, इराणची अणु ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. दरम्यान, ज्या कारवाईअंतर्गत इराणवर हा हल्ला करण्यात आला, त्या कारवाईला मिडनाईट हॅमर, असे नाव देण्यात आले होते, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली आहे.

अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर'! -
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे, "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला. आम्ही इराणी अणुकार्यक्रम उद्ध्वस्त केला. मिडनाईट हॅमर ऑपरेशनअंतर्गत नागरिकांना अथवा इराणी सैनिकांना लक्ष्य करण्यात आले नाही." याच बरोबर, "इराणने अमेरिकेविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या प्रत्युत्तराचा विचार केला, तर त्याला आणखी कठोर उत्तर दिले जाईल," असा इशाराही अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिला आहे.

इतर कुठलाही देश अशी  हिंमत करू शकत नाही : पीट हेगसेथ -
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेले नियोजन धाडसी आणि जबरदस्त होते. जगाने अमेरिकेची ताकद बघितली. जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बोलतात, तेव्हा जगाने ऐकायला हवे. पृथ्वीवरील इतर कोणताही देश अशी कारवाई करू शकला नसता. जेव्हा राष्ट्राअध्यक्ष 60 दिवस चर्चेचे आवाहन करतात, तेव्हा त्याचा अर्थ शांतता असतो. हे जुन्या सरकारचे प्रशासन नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना शांतता हवी आहे, आणि इराणने तो मार्ग स्वीकारायला हवा."
 

Web Title: America launched 'Midnight Hammer' on Iran, revealed the name of the operation; said, let Trump say it...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.