इराणने इस्रायलवर सोडलेली ७०हून जास्त मिसाइल्स आम्ही पाडली; अमेरिकन प्रशासनाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 14:43 IST2024-04-15T14:39:30+5:302024-04-15T14:43:32+5:30
America, Iran attacked Israel: इराणने इस्रायल्यावर केलेल्या हल्ल्याचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेनेही मदत केली असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

इराणने इस्रायलवर सोडलेली ७०हून जास्त मिसाइल्स आम्ही पाडली; अमेरिकन प्रशासनाचा दावा
America in Iran attacks Israel: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. याच दरम्यान इराणने देखील इस्रायलवर ड्रोन आणि मिसाईलने हल्ले केले. या हल्ल्यामुळे इस्रायलचे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. इस्रायलकडून या हल्ल्यानंतर इराणला आपण सज्ज असल्याचा इशाराही देण्यात आला. याच दरम्यान आता अमेरिकेकडून एक महत्त्वाचे विधान करण्यात आले आहे. इराणने इस्रायल्यावर केलेल्या हल्ल्याचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेनेही मदत केली असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
अमेरिकेने इस्रायलकडून सोडण्यात आलेले काही ड्रोन आणि मिसाईल पाडल्याचा दावा त्यांच्या प्रशासनाकडून करण्यात आला आहे. इराणने इस्रायलवर थेट हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ होती. इराणने डागलेल्या एकूण ड्रोन आणि मिसाइल्सपैकी ९९% मिसाईल आणि ड्रोन फारशी हानी होऊ न देता पाडण्यात आल्याचे इस्रायलकडून सांगण्यात येत आहे. तर, अधिकाधिक विनाश करणे आणि जास्तीत जास्त लोकांना ठार मारणे हा इराणचा हेतु होता, असा अमेरिकन प्रशासनाने दावा केला आहे. इस्रायल वर हल्ला करण्यासाठी इराणने सुमारे 115 ते 130 मिसाईल सोडली होती. इराणने एका वेळी सुमारे 100 हून अधिक मिसाईल इस्रायलवर हल्ला करण्यासाठी डागली होती. पण हल्ला सुरू असताना अमेरिकन उच्च अधिकारी आणि राष्ट्रपती जो बायडन हे व्हाईट हाऊसच्या माध्यमातून युद्ध परिस्थितीवर लक्ष ठेवून होते असेही अमेरिकाने सांगितले.
इराणची ७० मिसाइल्स अमेरिकेने पाडली!
अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की इराणने डागलेल्या मिसाईलपैकी ७०हून अधिक ड्रोन आणि बॅलेस्टिक मिसाईल अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी खाली पाडली. चार ते सहा बॅलेस्टिक मिसाईल्सना पूर्व भूमध्यसागरातच अमेरिकेत विमानांनी खाली पाडली आणि इराकमध्ये अमेरिकन बॅटरी मिसाईलने आणखी एक ड्रोन हल्ला परतावून लावला. बायडन म्हणाले की माझ्या सांगण्यावरूनच अमेरिकन सेनेने इस्रायलच्या संरक्षणासाठी गेल्या आठवड्यात काही लढाऊ विमाने तयार ठेवली होती या लढाऊ विमानां च्या द्वारे यशस्वीपणे कामगिरी पूर्ण करणाऱ्या असाधारण कौशल्य असलेल्या वैमानिकांचे मी अभिनंदन करतो इराणने इस्रायल वर केलेल्या द्रोण आणि मिसाइल हल्ल्यांचा सामना करून जवळपास सर्वच हल्ले परतावून लावण्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य केले आहे.