लादेनपेक्षा दुप्पट इनाम...'या' देशाच्या राष्ट्रपतींना पकडण्यासाठी अमेरिका करतोय प्रयत्न; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:43 IST2025-08-08T16:42:05+5:302025-08-08T16:43:11+5:30

ना दहशतवादी आरोप ना कसला खटला...तरीही अमेरिकेला या देशाच्या राष्ट्रपतींना का पकडायचे आहे?

America is trying to capture the president of venezuela nicolas maduro with a bounty twice that of Bin Laden | लादेनपेक्षा दुप्पट इनाम...'या' देशाच्या राष्ट्रपतींना पकडण्यासाठी अमेरिका करतोय प्रयत्न; कारण काय?

लादेनपेक्षा दुप्पट इनाम...'या' देशाच्या राष्ट्रपतींना पकडण्यासाठी अमेरिका करतोय प्रयत्न; कारण काय?

ना दहशतवादी आरोप ना कसला खटला...तरीही अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर ५० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४ अब्ज रुपये) बक्षीस जाहीर केले आहे. ही बक्षीसाची रक्कम अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन आणि इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू बकर अल-बगदादी याच्यावरील बक्षीसापेक्षा दुप्पट आहे. अमेरिकेने या दोन्ही दहशतवाद्यांवर प्रत्येकी २५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते. आता प्रश्न उद्भवतो की, अमेरिका व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना का पकडायचे आहे? 

निकोलस मादुरो यांच्यावर काय आरोप?

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या मते, निकोलस मादुरो हे ड्रग्ज तस्करी टोळीचे प्रमुख आहेत. मादुरोंच्या इशाऱ्यावर अमेरिकेत धोकादायक ड्रग्जची तस्करी केली जाते. अमेरिकन तपास संस्थेच्या मते, व्हेनेझुएला जगभरातील ड्रग्ज तस्करीसाठी पूल म्हणून काम करतो. दरवर्षी व्हेनेझुएलातून सुमारे २५० मेट्रिक टन ड्रग्जची तस्करी केली जाते.

ब्रिटिश वृत्तपत्र डेली मेलने एक दिवस आधीच एक बातमी प्रकाशित केली होती. त्यात म्हटले की, व्हेनेझुएला त्यांच्या पासपोर्टद्वारे बेकायदेशीर इराणी स्थलांतरितांना अमेरिकेत पाठवत आहे. अहवालात अशी भीती व्यक्त करण्यात आली होती की, काही दहशतवादी बनावट पासपोर्टद्वारे व्हेनेझुएलामधून अमेरिकेत प्रवेश करत आहेत. या कारणामुळेच अमेरिकेने त्यांच्यावर बक्षीस जाहीर केले आहे. मात्र, व्हेनेझुएलाचे परराष्ट्र मंत्री इव्हान गिल यांनी टेलिग्रामवर एक पोस्ट लिहून याला मूर्खपणा म्हटले.

व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यातील वाद
अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाद बराच जुना आहे. १९९९ मध्ये ह्यूगो चावेझ यांनी या दक्षिण अमेरिकन देशाची सूत्रे हाती घेतली. चावेझ यांनी अमेरिकन साम्राज्यवाद्यांविरुद्ध आघाडी उघडली. अमेरिकेने चावेझ यांना शांत करण्यासाठी सत्तापालट करण्याचा प्रयत्नही केला, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. चावेझ यांनी त्यांच्या राजवटीत व्हेनेझुएलामध्ये कम्युनिस्ट विचारसरणीची बीजे पेरली, ज्यामुळे अमेरिका खूप अस्वस्थ आहे. व्हेनेझुएलाचे सध्याचे अध्यक्ष निकोलस मादुरो हे चावेझ यांचे राजकीय शिष्य आहेत. मादुरो अमेरिकेविरुद्ध राजनैतिकदृष्ट्या आक्रमक आहेत.

Web Title: America is trying to capture the president of venezuela nicolas maduro with a bounty twice that of Bin Laden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.