२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 09:09 IST2026-04-12T09:07:01+5:302026-04-12T09:09:07+5:30

America Iran War:

america iran peace talks JD Vance said that we have not reached an agreement i think that is bad news for iran much more than the usa | २१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!

२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!

America Iran War: संपूर्ण जगाचे लक्ष लागलेली अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता बैठक कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली. दोन्ही देशात अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या. परंतु, इराणशी चर्चा फिस्कटली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स मायदेशात परतत असून, त्यांनीच याबाबत सविस्तर माहिती दिली.

पत्रकारांना संबोधित करताना व्हान्स म्हणाले की, वाईट बातमी अशी आहे की, आमच्यात कोणताही करार होऊ शकलेला नाही. मला वाटते की, अमेरिकेपेक्षा इराणसाठीच ही अधिक वाईट बातमी आहे. त्यामुळे, कोणताही करार न करताच आम्ही अमेरिकेला परत जात आहोत. त्यांनी आमच्या अटी स्वीकारणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या २१ तासांपासून या प्रक्रियेत आहोत

वाटाघाटींमध्ये काहीही उणिवा राहिल्या असल्या, तरी त्याचे कारण पाकिस्तानी नक्कीच नव्हते; त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केले. आमच्या व इराणींच्या दरम्यानचा दुरावा मिटवून एखादा करार घडवून आणण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. आम्ही गेल्या २१ तासांपासून या प्रक्रियेत आहोत. आम्ही इराणींशी अनेक महत्त्वपूर्ण चर्चा केल्या आहेत. ही चांगली बातमी आहे. आम्ही अद्याप कोणत्याही करारापर्यंत पोहोचू शकलो नाही. अमेरिकेसाठी ही जितकी वाईट बातमी आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक ती इराणसाठी वाईट बातमी आहे. कोणताही करार न करताच आम्ही आता अमेरिकेला परत जात आहोत. त्यांनी आमच्या अटी स्वीकारलेल्या नाहीत, असे व्हान्स यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, अमेरिका व इराणच्या शिष्टमंडळाचे पाकिस्तानमध्ये आगमन झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केल्या.  १९७९मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांतीनंतर दोन्ही देशांमधील संवाद थांबला होता. आता ४७ वर्षानंतर प्रथमच अमेरिका आणि इराण समोरासमोर बसून चर्चा करत असल्याचे दृश्य साऱ्या जगाने पाहिले. 

 

Web Title : 21 घंटे बाद अमेरिका-ईरान वार्ता विफल; अमेरिकी प्रतिनिधिमंडल लौटा।

Web Summary : पाकिस्तान में अमेरिका-ईरान शांति वार्ता विफल रही, अमेरिका ने ईरान पर शर्तों को अस्वीकार करने का आरोप लगाया। उपराष्ट्रपति वेंस ने प्रतिनिधिमंडल की वापसी की पुष्टि की, पाकिस्तान के मध्यस्थता प्रयासों को सराहा। 47 साल बाद हुई सीधी बातचीत बिना किसी समझौते के समाप्त हुई।

Web Title : US-Iran talks fail after 21 hours; US delegation returns.

Web Summary : US-Iran peace talks in Pakistan failed, with the US blaming Iran for rejecting terms. Vice President Vance confirmed the delegation's return, noting Pakistan's mediation efforts. 47 years after relations broke down, this face-to-face dialogue ended without a deal.