अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 09:03 IST2026-04-08T09:02:57+5:302026-04-08T09:03:50+5:30

America Iran Ceasefire: काही तासांपूर्वी इराणला पूर्णपणे नष्ट करण्याच्या इशारा देणारे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या इराणमध्ये अखेरच्या क्षणी युद्ध थांबवण्यावर एकमत झाले आणि दोन्ही पक्ष युद्धविरामावर सहमत झाले आहेत.

America Iran Ceasefire: America blocked missiles, Iran also stood firm on its position, finally 'China' entered, and a ceasefire was reached | अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम

अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम

गेल्या सव्वा महिन्यापासून आखातामध्ये अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेले युद्ध अखेर आज पहाटे थांबले आहे. काही तासांपूर्वी इराणला पूर्णपणे नष्ट करण्याच्या इशारा देणारे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या इराणमध्ये अखेरच्या क्षणी युद्ध थांबवण्यावर एकमत झाले आणि दोन्ही पक्ष युद्धविरामावर सहमत झाले आहेत. इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी पाकिस्तानच्या माध्यमातून आलेला युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारला आणि इराण व अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला. त्यामुळे दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्याचं श्रेय पाकिस्तानकडून घेतलं जात आहे. मात्र अमेरिका आणि इराणमधील हा भीषण संघर्ष थांबवण्यामध्ये पाकिस्तान नव्हे तर चीनने निर्णायक भूमिका बजावल्याचे आता समोर येत आहे. 

आखातामध्ये अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबवून युद्धविराम करण्यामध्ये चीननने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे वृत्त अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सने या वृत्तपत्राने दिले आहे. त्यामुळे युद्धविरामात आपण महत्त्वाची भूमिका बजावल्याचा पाकिस्तानचा दावा फोल ठरला आहे. जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना जाऊ दिले नाही तर रात्री इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करणार, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. त्यामुळे अमेरिका इराणमध्ये महाप्रचंड विध्वंस घडवणार, अशी भीती जगाला वाटत होती. त्यामुळेच जगातील अनेक देशांनी मुत्सद्देगिरीने युद्ध थांबवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. अमेरिकेतील विरोधी पक्षही ट्रम्प यांच्याविरोधात आक्रमक झाले होते. याचदम्यान, काही देशांनी इराणशी संपर्क साधून चर्चेला सुरुवात केली.

दरम्यान, तीन इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने न्यूयॉर्क टाईम्सने सांगितले की, पाकिस्तानने युद्ध थांबवण्यासाठी मुत्सद्देगिरीचे प्रयत्न निश्चितपणे केले. मात्र या वाटाघाटींमध्ये इराणचा मुख्य सहकारी असलेल्या चीनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अखेरच्या क्षणी चीनने पडद्याआडून सूत्रे हलवून हस्तक्षेप केला. त्यानंतर इराणने पाकिस्तानकडून आलेला युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकार केला.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे अनेक दिवसांपासून या संघर्षात मध्यस्थी करण्याचे प्रयत्न करत होते. मात्र इस्राइल आणि इराणही या मध्यस्थीवर राजी नव्हते. शेवटी चीनच्या सांगण्यावरून इराण युद्धविरामास राजी झाला. तसेच अमेरिकेने आमच्या अटी मान्य केल्या, असा दावा केला. तसेच इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनेही या युद्धविरामाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एवढेच नाही तर इराणकडून हा युद्धविराम आपल्या विजयाच्या स्वरूपात सादर केला जात आहे.

इराणमधील संघर्षात चीनने मध्यस्थी करण्यामागे अनेक कारणे आहेत. या युद्धाचा चीनलाही फटका बसत होता. इराणकडून चीनला होत असलेल्या खनिज तेलाच्या पुरवठ्यामध्ये अडथळे येत होते. तसेच इराणमधील खार्ग बेटावर अमेरिकेने हल्ला केल्याने चीनमध्ये इंधन टंचाई तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळेच पाकिस्तानकडून आलेल्या युद्धविरामाच्या प्रस्तावाची इराणकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने अखेर चीनने हस्तक्षेप केला आणि हा संघर्ष थांबवण्यासाठी पुढाकार घेतला.

Web Title : अमेरिका ने रोकी मिसाइलें, ईरान अडिग, चीन की एंट्री, युद्धविराम हुआ

Web Summary : चीन के हस्तक्षेप के बाद अमेरिका-ईरान संघर्ष समाप्त हुआ। पाकिस्तान का मध्यस्थता का दावा झूठा निकला। ट्रंप की विनाश की धमकी से वैश्विक चिंता और राजनयिक प्रयास हुए। तेल आपूर्ति संबंधी चिंताओं के कारण चीन के शामिल होने के बाद ईरान ने युद्धविराम स्वीकार कर लिया।

Web Title : US Halts Missiles, Iran Stands Firm, China Enters, Ceasefire Achieved

Web Summary : US-Iran conflict ends after China's intervention. Pakistan's mediation claim is refuted. Trump's threats of destruction led to global concern and diplomatic efforts. Iran accepted ceasefire after China's involvement due to oil supply concerns.