पाकिस्तानने अमेरिकेवर पुन्हा एकदा नाचक्कीची वेळ आणली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे आणखी एक एफ-१६ लढाऊ विमान पडले आहे. भारताकडे तेव्हा भारतीय बनावटीची आणि रशियन बनावटीची शस्त्रे होती. परंतू, आज जे अफगाणिस्तानने पाकिस्तानचे अमेरिकेने दिलेले लढाऊ विमान पाडले आहे, ते अमेरिकेच्याच शस्त्रांनी पाडले आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. अफगाणिस्तानची प्रमुख वृत्तसंस्था 'टोलो न्यूज' ने दिलेल्या माहितीनुसार, अफगाण लष्कराने आपल्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या एका F-16 फायटर जेटला पाडले आहे. या घटनेमुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांची झोप उडाली असून, दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव शिगेला पोहोचला आहे.
नेमकं काय घडलं?मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सज्ज असलेल्या अफगाण संरक्षण दलाने पाकिस्तानी विमानावर अमेरिकेच्याच लष्करी वाहनांवरील रॉकेट लाँचरद्वारे हल्ला केला. अमेरिकेने अफगाणिस्तान सोडताना बरीच वाहने, शस्त्रास्त्रे निकामी करून, महत्वाचे पार्ट काढून तिथेच सोडली होती. अफगाणिस्तानने ती पुन्हा जिवंत केली आहेत. आता यात शस्त्रांचा वापर करून अफगाणिस्तानने पाकिस्तानला नामोहरम करण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर या जळालेल्या विमानाच्या मलब्याचे फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये विमानाचा क्रमांक '85610' असल्याचे दिसत असून ते पाकिस्तानी हवाई दलाचे 'एरो स्क्वाड्रन' मधील असल्याचे दावे केले जात आहेत.
पाकिस्तानचे मौनआपल्या विमानाचे नुकसान झाल्याच्या वृत्तावर पाकिस्तानने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर अफगाणिस्तान डिफेन्सने हे विमान पाडल्याची पुष्टी केली आहे. या घटनेमुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे.
Web Summary : Afghanistan shot down a Pakistani F-16 with US weaponry, escalating tensions. Pakistan remains silent on the incident. The event strains regional geopolitics.
Web Summary : अफगानिस्तान ने अमेरिकी हथियारों का उपयोग करके पाकिस्तान के एफ-16 विमान को मार गिराया, जिससे तनाव बढ़ गया है। पाकिस्तान घटना पर चुप है। इससे क्षेत्रीय भू-राजनीति पर असर पड़ा है।