अमेरिकेने केला रामराम! WHOमधून बाहेर पडण्याचा ट्रम्प यांचा ऐतिहासिक निर्णय, पुढे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:56 IST2026-01-23T11:54:05+5:302026-01-23T11:56:03+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला शब्द खरा करत अमेरिकेला अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर काढले आहे.

America has said goodbye! Trump's historic decision to withdraw from WHO, what will happen next? | अमेरिकेने केला रामराम! WHOमधून बाहेर पडण्याचा ट्रम्प यांचा ऐतिहासिक निर्णय, पुढे काय होणार?

अमेरिकेने केला रामराम! WHOमधून बाहेर पडण्याचा ट्रम्प यांचा ऐतिहासिक निर्णय, पुढे काय होणार?

जागतिक राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला शब्द खरा करत अमेरिकेला अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर काढले आहे. गुरुवारी या प्रक्रियेवर अंतिम शिक्कामोर्तब झाले असून, जिनेव्हा येथील WHOच्या मुख्यालयाबाहेरून अमेरिकेचा ध्वजही हटवण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक आरोग्य क्षेत्रात मोठा भूकंप झाला असून संघटनेसमोर आतापर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

कोविडमधील चूक भोवली! 

कोविड-१९ महामारीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली, त्यावर ट्रम्प प्रशासन प्रचंड नाराज होते. "WHOने चीनची पाठराखण केली आणि अमेरिकेला अंधारात ठेवले," असा आरोप करत ट्रम्प यांनी सत्तेवर येताच पहिल्याच दिवशी संघटनेतून बाहेर पडण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. वर्षभर दिलेल्या इशाऱ्यानंतर आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

रसद तोडली, निधी रोखला! 

अमेरिका हा जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक निधी देणारा देश होता. संघटनेच्या एकूण बजेटपैकी तब्बल १८ टक्के वाटा एकटा अमेरिका उचलत असे. मात्र, ट्रम्प यांच्या आदेशानंतर ही सर्व फंडिंग आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नियमानुसार, बाहेर पडण्यापूर्वी अमेरिकेला २६ कोटी डॉलर्सची थकबाकी भरणे गरजेचे होते, परंतु अमेरिकन परराष्ट्र विभागाने ती भरण्यास स्पष्ट नकार दिला आहे. "आमच्या जनतेने यापूर्वीच खूप काही दिले आहे, आता एक रुपयाही देणार नाही," अशी आक्रमक भूमिका अमेरिकेने घेतली आहे.

WHOचा अर्धा कर्मचारी वर्ग घरी जाणार? 

अमेरिकेने पाठ फिरवल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेची  अवस्था बिकट झाली आहे. निधीअभावी संघटनेला आपली 'मॅनेजमेंट टीम' निम्मी करावी लागली आहे. अनेक देशांमधील आरोग्य प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या वर्षाच्या मध्यापर्यंत जवळपास २५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करावी लागणार असल्याचे संकेत संघटनेने दिले आहेत. आगामी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या बोर्ड बैठकीत अमेरिकेच्या या अनपेक्षित एक्झिटवर मोठी चर्चा होणार आहे.

अमेरिका स्वतःची नवी यंत्रणा उभारणार? 

महत्त्वाची बाब म्हणजे, अमेरिका आता पुन्हा कधीही WHOचा भाग होणार नसल्याचे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यापुढे रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा सार्वजनिक आरोग्यासाठी अमेरिका कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघटनेवर अवलंबून न राहता, थेट इतर देशांशी वैयक्तिक पातळीवर करार करेल. काही तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प आता WHO ला समांतर अशी एखादी नवीन आरोग्य संस्था उभी करण्याची शक्यता आहे.

तजॉर्जटाउन युनिव्हर्सिटीचे लॉरेन्स गोस्टिन यांच्या मते, ट्रम्प यांचे हे पाऊल अमेरिकन कायद्याचे उल्लंघन करणारे असले तरी, जागतिक आरोग्यावर याचे परिणाम भयावह असतील. पोलिओ निर्मूलन, लसीकरण आणि भविष्यातील महामारी रोखण्यासाठी WHO कडे आता पुरेसा पैसा उरलेला नाही, हीच खरी चिंतेची बाब आहे.

Web Title : अमेरिका WHO से बाहर: ट्रम्प का फैसला, वैश्विक स्वास्थ्य पर संकट।

Web Summary : ट्रम्प ने कोविड-19 कुप्रबंधन के कारण अमेरिका को WHO से बाहर निकाला। फंडिंग में कटौती से WHO पंगु, कर्मचारी कटौती और कार्यक्रम बंद। अमेरिका वैकल्पिक स्वास्थ्य निकाय स्थापित कर सकता है, जिससे वैश्विक स्वास्थ्य प्रभावित होगा।

Web Title : US exits WHO: Trump's decision rocks global health, future uncertain.

Web Summary : Trump pulled the US out of the WHO, citing COVID-19 mismanagement and pro-China bias. Funding cuts cripple WHO, forcing staff reductions and program closures. US may establish alternative health body, impacting global health initiatives.