Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 07:47 IST2025-06-19T07:45:39+5:302025-06-19T07:47:14+5:30

India Pakistan Tension: पंतप्रधान मोदींची स्पष्टोक्ती; ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा

America has nothing to do with stopping Operation Sindoor | Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!

कॅनानास्किस (कॅनडा): ऑपरेशन सिंदूर अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे किंवा व्यापार कराराच्या प्रस्तावामुळे नव्हे तर पाकिस्तानच्या विनंतीवरून तूर्त थांबविले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठामपणे सांगितले. या दोघांमध्ये दूरध्वनीवरून सुमारे ३५ मिनिटे संभाषण झाले. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळेच भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली, असा दावा ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. यासंदर्भात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, भारताने तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारण्यास कधीही मान्यता दिलेली नाही. 

मीच युद्ध थांबवले; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध मी थांबवले या दाव्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी पुन्हा आधीचीच भूमिकाच मांडली. भारत-अमेरिकेत व्यापार करार लवकरच होईल असेही त्यांनी सांगितले. मला पाकिस्तान खूप आवडतो, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

Web Title: America has nothing to do with stopping Operation Sindoor