लॉस एन्जिलिसच्या सुपर मार्केटमध्ये गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 07:27 IST2018-07-22T07:27:42+5:302018-07-22T07:27:59+5:30

लॉस एन्जिलिसमधील सुपर मार्केटमध्ये गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

america firing in los angeles supermarket trader joe police surrounded the area | लॉस एन्जिलिसच्या सुपर मार्केटमध्ये गोळीबार

लॉस एन्जिलिसच्या सुपर मार्केटमध्ये गोळीबार

लॉस एन्जिलिसच्या सुपर मार्केटमध्ये गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका बंदुकधारी व्यक्तीनं मार्केटमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसराला घेराव घालत संशयिताला ताब्यात घेतले. लॉस एन्जिलिस पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरानं सुरुवातील एका वयोवृद्ध महिला आणि तरुणीवर गोळीबार केला. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होताच हल्लेखोरानं पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न फसला. दरम्यान, घटना घडली त्यावेळेस मोठ्या प्रमाणात नागरिक तेथे हजर होते. 





Web Title: america firing in los angeles supermarket trader joe police surrounded the area