जागतिक आरोग्य संघटनेतून अखेर अमेरिका बाहेर; अमेरिकेला द्यावे लागणार तब्बल २६ कोटी डॉलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:30 IST2026-01-24T13:29:35+5:302026-01-24T13:30:19+5:30

प्रक्रिया पूर्ण; ७८ वर्षांनंतर संपुष्टात आली कटिबद्धता

America finally leaves the World Health Organization as they will have to pay a whopping $260 million | जागतिक आरोग्य संघटनेतून अखेर अमेरिका बाहेर; अमेरिकेला द्यावे लागणार तब्बल २६ कोटी डॉलर

जागतिक आरोग्य संघटनेतून अखेर अमेरिका बाहेर; अमेरिकेला द्यावे लागणार तब्बल २६ कोटी डॉलर

न्यूयॉर्क: जागतिक आरोग्य संघटनेतून (डब्ल्यूएचओ) बाहेर पडण्याची प्रक्रिया अमेरिकेने पूर्ण केली आहे. गुरुवारी अमेरिकी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सुमारे ७८ वर्षे या देशाची डब्ल्यूएचओशी असलेली कटिबद्धता या निमित्ताने संपुष्टात आली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सुमारे एक वर्षापूर्वी पदग्रहणाच्या पहिल्याच दिवशी याबाबत घोषणा केली होती. अमेरिकेने डब्ल्यूएचओला या निर्णयापोटी २६ कोटी डॉलर एवढी रक्कम द्यावी लागेल.

अमेरिकेची ही होती भूमिका

संयुक्त राष्ट्रसंघाची आरोग्य संस्था असलेल्या डब्ल्यूएचओला अमेरिका मोठ्या प्रमाणात निधी पुरवत होती. संघटनेच्या एकूण निधीपैकी सुमारे १८ टक्के निधी एकट्या अमेरिकेचा होता. यामुळे आता संघटनेच्या खर्चावर बऱ्याच मर्यादा येणार आहेत.

परिणाम काय?

अमेरिका या संघटनेतून बाहेर पडल्यामुळे जगातील आरोग्यासंबंधीचे धोक्यांची माहिती घेऊन त्याबाबत सहकार्य करण्याच्या प्रणाली आता कमकुवत होतील. 
दुसरीकडे अमेरिकेने डब्ल्यूएचओतून बाहेर पडण्याची घोषणा केल्यापासून संस्थेसमोर निधीचे संकट निर्माण झाले आहे. याशिवाय अमेरिकी शास्त्रज्ञ तसेच औषधी कंपन्यांच्या नवीन महामारीशी निपटण्यासाठी आवश्यक लसींच्या निर्मितीच्या क्षमतेवर परिणाम होणार आहे.

Web Title : अमेरिका विश्व स्वास्थ्य संगठन से बाहर, 26 करोड़ डॉलर बकाया।

Web Summary : अमेरिका 78 वर्षों बाद WHO से बाहर हो गया, जिस पर 26 करोड़ डॉलर बकाया है। इससे वैश्विक स्वास्थ्य सहयोग कमजोर होगा और संगठन के लिए धन की समस्याएँ पैदा होंगी। यह महामारी की तैयारी और वैक्सीन विकास को प्रभावित करता है।

Web Title : US exits WHO, owing $260 million; a global health blow.

Web Summary : America finalized its withdrawal from the WHO after 78 years, owing $260 million. This weakens global health cooperation and creates funding challenges for the organization. The exit impacts pandemic preparedness and vaccine development efforts.