शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

America Donald Trump : इम्रानप्रमाणे 'तोशाखाना' प्रकरणात अडकले ट्रम्प; मोदी-योगींनी दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू लपवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 13:29 IST

America Donald Trump : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याप्रमाणे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही आरोप लावण्यात आले आहेत.

America Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याप्रमाणे 'तोशाखाना' सारख्या घोटाळ्याचा आरोप लागला आहे. ट्रम्प यांनी अध्यक्ष असताना परदेशी नेत्यांकडून मिळालेल्या 250,000 डॉलर (2.06 कोटी रुपये) किमतीच्या भेटवस्तू उघड न केल्याचा आरोप आहे. या भेटवस्तूंमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दिलेल्या भेटवस्तूंचाही समावेश आहे.

अमेरिकन काँग्रेसच्या डेमोक्रॅट समितीने दिलेल्या अहवालात ट्रम्प यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. ट्रम्प यांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मिळालेल्या सुमारे 100 विदेशी भेटवस्तूंचा खुलासा केला नसल्याचा आरोप आहे. त्या वस्तुंची किंमत 250,000 डॉलर्स आहे. रिपोर्टनुसार, ट्रम्प कुटुंबाला त्यांच्या भारत भेटीदरम्यान एकूण 17 भेटवस्तू मिळाल्या. त्यांची किंमत 47,000 यूएस डॉलर होती. यामध्ये योगी आदित्यनाथ यांची $ 8,500 ची फुलदाणी, $ 4,600 चे ताजमहालचे मॉडेल, माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिलेला $ 6600 किमतीचा भारतीय गालिचा, पंतप्रधान मोदी यांनी दिलेले $ 1900 चे कफलिंक यांचा समावेश आहे.

ट्रम्प हे 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष होते''सऊदी स्वार्ड, इंडियन ज्वेलरी अँड अ लार्जर दॅन लाइफ साल्वाडोरन पोर्ट्रेट ऑफ डोनाल्ड ट्रम्प: द ट्रम्प अॅडमिनिस्ट्रेशन फेलियर टू डिसक्लोज मेजर फॉरन गिफ्ट'' असे या रिपोर्टचे शीर्षक आहे. डेमोक्रॅट समितीने केलेल्या प्राथमिक तपासात असे समोर आले की, ट्रम्प अध्यक्ष असताना परदेशी सरकारी अधिकाऱ्यांना या भेटवस्तुंची माहिती देण्यात अपयशी ठरले. परदेशी भेटवस्तू आणि सजावट कायद्यांतर्गत त्यांनी तसे करायला हवे होते. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे नेते असून, 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष होते.

इम्रान खान अशाच एका प्रकरणात अडकलेपाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाही अशाच तोशाखाना प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी पाकिस्तान निवडणूक आयोगाने इम्रान खान यांचे संसद सदस्यत्व रद्द केले असून, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. खान यांनी पंतप्रधान असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे.

काय आहे तोशाखाना प्रकरण?तोशाखाना हा पाकिस्तानी मंत्रिमंडळाचा एक विभाग आहे, जिथे इतर देशांचे सरकार, राष्ट्रप्रमुख आणि परदेशी पाहुण्यांनी दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू ठेवल्या जातात. नियमानुसार इतर देशांच्या प्रमुखांकडून किंवा मान्यवरांकडून मिळालेल्या भेटवस्तू तोशाखान्यात ठेवणे आवश्यक असते.  2018 मध्ये इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. विविध देशाकडून त्यांना महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्या वस्तू इम्रानने तोशाखान्यात जमा केल्या होत्या, पण नंतर त्या स्वस्तात विकत घेऊन भरघोस नफ्यात विकल्याचा आरोप इम्रानवर आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ