शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले - माझी पत्नी मेलानिया सर्वात सुंदर, पण 'या' एका गोष्टीचं दुःख!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 27, 2020 8:40 PM

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, यापूर्वी बराक ओबामा (Barack Obama) यांच्या कार्यकाळात मिशेल ओबामा (Michelle Obama) यांना 8 वर्षांत 12 मोठ्या मॅगझीन्सनी अनेक वेळा आपल्या कव्हर पेजवर स्थान दिले.

वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी, आपली पत्नी मेलानिया ट्रम्प (Melania Trump) यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणत, माध्यमांवर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, अमेरिकेच्या इतिहासात मेलानिया सर्वात सुंदर फर्स्ट लेडी आहे. मात्र, 4 वर्षांत त्यांना कोणत्याही मोठ्या मॅगझीनने आपल्या कव्हर पेजवर स्थान दिले नाही. 

मिशेल ओबामांना 12 मॅगझीनने दिली संधी -डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, यापूर्वी बराक ओबामा (Barack Obama) यांच्या कार्यकाळात मिशेल ओबामा (Michelle Obama) यांना 8 वर्षांत 12 मोठ्या मॅगझीन्सनी अनेक वेळा आपल्या कव्हर पेजवर स्थान दिले.

माध्यमांवर भेदभावाचा आरोप -डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन माध्यमांवर भेदभावाचा आरोप केला असून माझ्या कार्यकाळात मेलानिया ट्रम्प यांना कुठल्याही मॅगझीनने कव्हर पेजवर जागा दिली नाही. तसेच कसल्या प्रकारची संधीही दिली नाही. मात्र, आता कार्यकाळ संपत असताना माध्यमे मेलानिया यांना महान म्हणत आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या आरोपावर अनेक मॅगझीन्सनी प्रतिक्रिया दिली असून हे तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांच्याशी लग्न करण्यापूर्वी मॉडेल होत्या मेलानिया ट्रम्प -डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी लग्न करण्यापूर्वी मेलानिया या एक मॉडेल होत्या. लग्नानंतर मेलानिया यांना ख्रिश्चन डायर वेडिंग ड्रेसमध्ये व्होगच्या मुखपृष्ठावर झळकण्याची संधी मिळाली होती. 

कोण आहेत मेलेनिया ट्रम्प?मॉडेल ते फर्स्ट लेडी झालेल्या मेलेनिया यांचा प्रवास अत्यंत रंजक आहे. मेलेनिया या लहान देशातून आल्या असल्या तरी त्यांची मॉडेल म्हणून कामगिरी वाखण्याजोगी होती. मेलेनिया या डोनाल्ड ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. मेलानिया यांचा जन्म 1970 मध्ये यूगोस्लाव्हिया येथे झाला. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. मेलानिया यांना अनेक भाषा अवगत आहेत. त्यांना इंग्रेजी, स्लोवेनियाई, फ्रेन्च, सर्बियन, इटालियन आणि जर्मन भाषा अवगत आहेत. कोरोना लस नाताळचा चमत्कार -नाताळच्या निमित्ताने राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ट्रम्प व फर्स्ट लेडी मेलानिया यांनी कोरोना लस हा नाताळचा चमत्कार असल्याचे म्हटले होते. त्यांनी एक व्हिडिओ जारी करून लोकांना शुभेच्छा दिला. आम्ही सर्व संशोधक, कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभारी आहोत. या सर्वांनी हे कठीण काम शक्य करून दाखवले. खरेतर हा नाताळचा चमत्कार आहे. मेलानिया म्हणाल्या, यंदाचा नाताळ वेगळा आहे. आपण सगळे महामारीला तोंड देत आहोत. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाMelania Trumpमेलेनिया ट्रम्प