घरगुती वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 11:53 IST2025-09-18T11:53:10+5:302025-09-18T11:53:58+5:30

अमेरिकेच्या दक्षिण पेनसिल्व्हेनियातील धक्कादायक घटना.

America Crime Policemen who went to resolve a domestic dispute were shot; three killed, two seriously injured | घरगुती वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

घरगुती वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी


America Crime : अमेरिकेतील दक्षिण पेनसिल्व्हेनियामधील नॉर्थ कोडोरस टाउनशिपमध्ये बुधवारी झालेल्या ताबडतोब गोळीबाराच्या घटनेत 3 पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. घरगुती वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर अचानक गोळीबार करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात हल्लेखोराला घटनास्थळीच ठार करण्यात आले.  या घटनेच्या निषेधार्थ शेकडो लोक रस्त्यावर उतरले आणि रात्री उशिरापर्यंत आंदोलन केले.

ही घटना फिलाडेल्फियापासून अंदाजे 185 किलोमीटर पश्चिमेला मेरीलँड सीमेजवळील भागात घडली. घरगुती वादाशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोहोचलेल्या पोलिसांवर अचानक गोळीबार करण्यात आला. स्थानिक व राज्य प्रशासनाने या दु:खद घटनेची पुष्टी केली आहे. अद्याप हल्लेखोराची व मृत पोलिसांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच कोणत्या परिस्थितीत गोळीबार सुरू झाला आणि पोलिसांना कसे मारण्यात आले, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर काय म्हणाले?

या धक्कादायक घटनेनंतर पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो यांनी शोक व्यक्त करताना म्हटले की, देशाची सेवा करताना प्राण गमावलेल्या तीन शूर पोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल आम्ही गहन शोक व्यक्त करतो. ही मोठी हानी आहे. अशा प्रकारची हिंसा कोणत्याही स्वरूपात स्वीकारार्ह नाही. समाज म्हणून आपण अधिक चांगले करण्याची गरज आहे.

घटनेनंतर कडक सुरक्षा

घटनेनंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा कडक करण्यात आली असून तपास सुरू आहे. एफबीआय आणि इतर संघीय संस्था या तपासात सहभागी झाल्या आहेत, जेणेकरून या घटनेमागील कारणे समजू शकतील. स्थानिक समुदाय व पोलिस विभागात शोककळा पसरली आहे. मृत पोलिस अधिकाऱ्यांना लवकरच सन्मानपूर्वक श्रद्धांजली दिली जाणार आहे. जखमींचा स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे, त्यापैकी एका अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: America Crime Policemen who went to resolve a domestic dispute were shot; three killed, two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.