Amazon CEO च्या समोरच गर्लफ्रेंड अॅक्टरसोबत करू लागली फ्लर्ट! VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 15:55 IST2021-11-09T15:54:22+5:302021-11-09T15:55:59+5:30
6 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ लिओनार्दो डिकॅप्रियोसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. पण...

Amazon CEO च्या समोरच गर्लफ्रेंड अॅक्टरसोबत करू लागली फ्लर्ट! VIDEO व्हायरल
आयकॉनिक चित्रपट 'टायटॅनिक'चा अभिनेता लिओनार्दो डिकॅप्रियोला अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांनी विनोदी पद्धतीने धमकी दिली आहे. खरे तर, ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ लिओनार्दो डी कॅप्रियोसोबत बोलताना दिसत आहे. तर जेफ बेझोस त्याच्यासोबत शांतपणे उभे आहेत.
यूएसए टुडेच्या वृत्तानुसार, शनिवारी लॉस एंजेलिसमध्ये एलएसीएमए आर्ट + चित्रपट उत्सवादरम्यान सहा सेकंदांचा व्हिडिओ चित्रित झाला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर 16 मिलियनहून अधिक वेळा बघण्यात आला आहे. या क्लिपमध्ये लॉरेन सांचेज लियोनार्दो डिकॅप्रियोसोबत बोलताना आणि हसताना दिसत आहे.
6 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ लिओनार्दो डिकॅप्रियोसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. मात्र, याला असा कोणताही दुजोरा मिळाला नसला तरी, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, जेफ बेझोस यांनी निश्चितपणे प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिओनार्दो डिकॅप्रियोला विनोदी पद्धतीने धमकी दिली आहे.
Hey Jeff mate. Can I have £5? @JeffBezos
— Diogo🇵🇹 (@thfcdiogo) November 9, 2021
जेफ बेझोसने ट्विटरवर एक फोटो शेअर करत लिहिले आहे, लिओ, येथे ये. मला तुला काहीतरी दाखवायचे आहे. त्यांच्या ट्विटसोबत, जेफ बेझोसने स्वतःचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे आणि एका बोर्डवर लिहिले आहे, की डेंजर! उंच कडा! प्राणघातक खोली!