शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

गुहेत अडकलेल्या फूटबॉलपटूंच्या मदतीसाठी धावला एलन मस्क

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 12:45 PM

थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या फूटबॉलपटूंच्या मदतीसाठी अमेरिकन अंतराळउद्योजक एलन मस्क धावला आहे. एलन मस्कने प्रोटोटाइप सबमरिनची मदत देऊ केली आहे.

बँकॉक- थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या फूटबॉलपटूंच्या मदतीसाठी अमेरिकन अंतराळउद्योजक एलन मस्क धावला आहे. एलन मस्कने 'प्रोटोटाइप सबमरिन'ची मदत देऊ केली आहे. या गुहेत अजूनही 5 मुले अडकलेली आहेत. 'मी आताच तीन नंबरच्या गुहेतून बाहेर आलो आहे' असे ट्वीट एलन मस्कने केले आहे.

जर गरज पडली तर मिनीसब तयार आहे रॉकेटच्या सुट्या भागांपासून ते तयार करण्यात आले आहे. वाइल्ड बोअर या फूटबॉल संघावरुनच त्याचे नामकरण करण्यात आले आहे. त्याची गरज पडली तर वापरता यावे यासाठी मी तेथे येथेच ठेवत आहे असे एलन मस्कने जाहीर केले आहे.

इन्स्टाग्रामवरती एलनने पाण्याने भरलेल्या या गुहेतील व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. अजूनही आत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत. त्यांच्या मदतीसाठी एलनने मिनिसब देऊ केली आहे.'' एकावेळेस दोन पाणबुड्या व्यक्तींना घेऊन जाऊ शकेल आणि अत्यंत चिंचोळ्या जागेतून ती प्रवास करु शकेल'' असं एलनने स्पष्ट केलं आहे. ''आत बसलेल्या व्यक्तीला पोहणं आलंच पाहिजे असं नाही तसेच ऑक्सीजन कुप्यांचा वापर कसा करायचा हे माहिती नसलं तरी चालतं'' असं एलनने या मिनिसबची माहिती देताना सांगितले.

नौदलाने डोंगराच्या कड्याचा भाग १00 ठिकाणी ड्रिल मशिनने खणण्याचे काम सुरू केले आहे. आतमध्ये अडकलेल्या सर्वांना प्राणवायूचा पुरवठा होत राहावा, यासाठी पाइपलाइन टाकून पूर्ण झाली आहे. त्यामुळे मुले व प्रशिक्षकांना श्वासोच्छवासात कोणतेही अडथळे आलेले नाहीत.सध्या रशियात वर्ल्ड कप फुटबॉलचे सामने सुरू आहेत. फिफाच्या अध्यक्षांनी आत अडकलेल्या सर्व मुलांच्या सुटकेसाठी प्रार्थना करतानाच, सुटकेनंतर त्यांना अंतिम सामना पाहायला येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे ही मुले आनंदून गेली आहेत. 

 

टॅग्स :ThailandथायलंडUnited StatesअमेरिकाFootballफुटबॉल