अल जझिराच्या पत्रकाराला अटक

By Admin | Updated: June 22, 2015 00:19 IST2015-06-22T00:19:06+5:302015-06-22T00:19:06+5:30

मध्यपूर्वेतील टीव्ही वाहिनी अल जझिराच्या पत्रकाराला जर्मनीत अटक झाली असून, त्याची त्वरित सुटका करा, अशी विनंती अल

Al Jazeera's journalist arrested | अल जझिराच्या पत्रकाराला अटक

अल जझिराच्या पत्रकाराला अटक

दोहा : मध्यपूर्वेतील टीव्ही वाहिनी अल जझिराच्या पत्रकाराला जर्मनीत अटक झाली असून, त्याची त्वरित सुटका करा, अशी विनंती अल जझिराने जर्मनीला केली आहे. अहमद मन्सूर याच्याविरुद्ध इजिप्तने आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट काढले होते, असे जर्मनीचे म्हणणे आहे.
इजिप्तमध्ये त्याच्यावर छळाचा गुन्हा असून तेथील न्यायालयात त्याला १५ वर्षांची शिक्षा झाली आहे. अहमद मन्सूर याला इजिप्त व ब्रिटन असे दुहेरी नागरिकत्व असून, त्याच्यावर केलेले छळाचे आरोप खोटे असल्याचे अल जझिराचे म्हणणे आहे.
शनिवारी रात्री मन्सूर बर्लिन विमानतळावरच होता. त्याने फोन करून अल जझिराला आपली स्थिती कळवली. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Al Jazeera's journalist arrested