कॅलिफोर्नियामध्ये अकाली दलाच्या नेत्याला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 11:40 IST2018-08-26T11:33:10+5:302018-08-26T11:40:26+5:30

अकाली दलाचे नेते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष मनजीत सिंग यांच्यावर कॅलिफोर्नियामध्ये हल्ला करण्यात आला.

Akali Dal leader & Delhi Sikh Gurdwara Management Committee member Manjeet Singh GK attacked | कॅलिफोर्नियामध्ये अकाली दलाच्या नेत्याला बेदम मारहाण

कॅलिफोर्नियामध्ये अकाली दलाच्या नेत्याला बेदम मारहाण

कॅलिफोर्निया - अकाली दलाचे नेते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष मनजीत सिंग यांच्यावर कॅलिफोर्नियामध्ये हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सिंग यांना यामध्ये बेदम मारहाण करण्यात आली असून तोंडाला काळे फासण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.



‘वीस पेक्षा अधिक लोकांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्यावर हल्ला करताना ते लोक आपण गुरुद्वारेजवळ आहोत हे देखील विसरले होते. पण मला त्याचे भान होते त्यामुळे मी माझ्या समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पण या अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. मला खात्री आहे ज्यांनी माझ्यावर हल्ला केला ते आयएआयशी संबंधित होते’, अशी प्रतिक्रिया मनजीत सिंग यांनी स्वत: ट्विटरवरून दिली आहे.



 

Web Title: Akali Dal leader & Delhi Sikh Gurdwara Management Committee member Manjeet Singh GK attacked