शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 20:58 IST2025-11-11T20:54:48+5:302025-11-11T20:58:03+5:30
बांगलादेशात सरकारने प्राथमिक शाळांमधील संगीत आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांची नियुक्ती रद्द केली आहे. याविरोधात विद्यार्थी आणि शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत.

शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
काही महिन्यापूर्वी बांगलादेशात विद्यार्थींनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. यामुळे शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आहे, आता या सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. धोरणात्मक बदलाचे आता सांस्कृतिक चळवळीत रूपांतर झाले आहे. बांगलादेशातील प्रमुख विद्यापीठांमधील विद्यार्थी आणि शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी चांगल्या वेतनाच्या किंवा राजकीय सुधारणांच्या मागणीसाठी नाही, तर त्याहूनही अधिक मूलभूत गोष्टींसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला सत्तेवर आलेल्या मोहम्मद युनूस सरकारने प्राथमिक शाळांमध्ये संगीत आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांची नियुक्ती करण्याचे नियोजन केले आहे. प्रशासकीय अडचणी आणि बजेटची कमतरता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पण आंदोलकांचे म्हणणे आहे की खरे कारण वेगळे आहे - सरकार इस्लामिक गटांच्या दबावाला बळी पडले ज्यांनी या विषयांना 'अ-इस्लामिक' म्हणून ब्रँड केले आहे. बांगलादेशच्या विद्यार्थी चळवळींचे केंद्रस्थान असलेल्या ढाका विद्यापीठात, शेकडो विद्यार्थी 'अजेय बांगला' पुतळ्याखाली राष्ट्रगीत आणि १९७१ च्या मुक्तिसंग्रामातील गाणी म्हणत जमले.
संपूर्ण बांगलादेशात संगीत बंदीच्या विरोधात निदर्शने
चितगावपासून राजशाहीपर्यंत, जगन्नाथपासून ढाकापर्यंत, बांगलादेशातील विद्यापीठांचे परिसर संगीतविरोधी घोषणांनी आणि संगीत बंदीच्या संदर्भात गाण्यांनी वातावरण ढवळून निघाले. कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही चळवळ आता देशभर पसरली आहे. शाळांमध्ये संगीत आणि पीटी शिक्षकांची नियुक्ती पूर्ववत करावी, अशी त्यांची मागणी आहे.