शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:19 IST

महत्वाचे म्हणजे, दोन्ही देशांकडून रशियाला भारतीय निर्यात वाढविण्यासह द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा हा  संकल्प, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि टॅरिफ धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये दरी वाढत असतानाच करण्यात आला आहे.

भारत आणि रशियाने गुरुवारी आपला द्विपक्षीय व्यापार संतुलित पद्धतीने वाढवण्याचा आणि ऊर्जा सहकार्य कायम ठेवण्याचा संकल्प केला. याच वेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नॉन-टॅरिफ अडथळे आणि नियामक अडथळे लवकरात लवकर दूर करण्याची आवश्यकताही अधोरेखित केली. महत्वाचे म्हणजे, दोन्ही देशांकडून रशियालाभारतीय निर्यात वाढविण्यासह द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा हा  संकल्प, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि टॅरिफ धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये दरी वाढत असतानाच करण्यात आला आहे.

रशियन समकक्ष सर्गेई लावरोव्ह यांच्यासोबतच्या व्यापक चर्चेनंतर, संयुक्त पत्रकार परिषदेत जयशंकर म्हणाले, "भारत-रशिया संबंध हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगातील सर्वात प्रमुख संबंधांपैकी एक आहेत," असे आम्हाला वाटते. तसेच, भू-राजकीय परिस्थिती, जन भावना आणि नेतृत्व संपर्क हे याचे प्रमुख घटक राहतील," असेही जयशंकर म्हणाले. खरे तर, नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येत आहेत,या दृष्टीने विविध पैलूंना अंतिम रूप देण्यासाठी जयशंकर मंगळवारी (१९ ऑगस्ट) मॉस्को येथे पोहोचले.

द्विपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन देणे लक्ष -जयशंकर आणि लावरोव्ह यांनी दहशतवादाचा सामना करण्याच्या पद्धतींवरही चर्चा केली. जयशंकर म्हणाले, "दहशतवादाच्या मुद्द्यावर, आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादविरुद्ध एकत्रितपणे लढण्याचा संकल्प केला. मी कुठल्याही परिस्थितीत दहशतवाद सहन न करण्याचा भारताचा द्दढ संकल्प आणि सीमा पार दहशतवादापासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा आपला सार्वभौम अधिकार व्यक्त केला." 

द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा प्रयत्न - परराष्ट्रमंत्री म्हणाले, "आपण रशियाला भारताची निर्यात वाढवण्यासह संतुलित आणि शाश्वत पद्धतीने द्विपक्षीय व्यापार वाढवण्याच्या सामायिक महत्त्वाकांक्षेची पुष्टी केली. यासाठी नॉन-टेरिफ अडथळे आणि नियामक अडथळे त्वरित दूर करणे आवश्यक आहे. औषधनिर्माण, शेती आणि वस्त्रोद्योग यांसारख्या क्षेत्रात रशियाला भारतीय निर्यात वाढवल्याने विद्यमान असमतोल दूर होण्यास निश्चितच मदत होईल. 

जयशंकर पुढे म्हणाले, "खतांचा दीर्घकालीन पुरवठा सुनिश्चित करण्यासंदर्भातही पावले उचलण्यात आली आहेत. भारतीय कुशल कामगार, विशेषतः आयटी, बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगार, रशियाची कामगार गरज पूर्ण करू शकतात आणि सहकार्य अधिक बळकट करू शकतात." ते म्हणाले, व्यापार आणि गुंतवणुकीद्वारे ऊर्जा सहकार्य राखणेही महत्त्वाचे आहे.

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनAmericaअमेरिकाIndiaभारत